स्तोत्रसंहिता 15 : 1 (IRVMR)
देवाच्या पवित्र डोंगरावरील रहिवासी दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?
स्तोत्रसंहिता 15 : 2 (IRVMR)
जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो.
स्तोत्रसंहिता 15 : 3 (IRVMR)
जो आपल्या जीभेने चुगली करत नाही, किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही, किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही.
स्तोत्रसंहिता 15 : 4 (IRVMR)
अधमाचा तिरस्कार करतो, परंतु जे परमेश्वराचे भय धरतात त्यांचा सन्मान करतो, जो वचन देऊन आपले अहीत झाले तरी मागे हटत नाही,
स्तोत्रसंहिता 15 : 5 (IRVMR)
जेव्हा तो पैसे उधार देतो तेव्हा व्याज घेत नाही, जो निर्दोष लोकांविरूद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही. तो, जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.
❮
❯