स्तोत्रसंहिता 150 : 1 (IRVMR)
परमेश्वराचे स्तवन करा परमेश्वराची स्तुती करा. देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 150 : 2 (IRVMR)
त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 150 : 3 (IRVMR)
शिंग वाजवून त्याची स्तुती करा; सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 150 : 4 (IRVMR)
डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 150 : 5 (IRVMR)
जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 150 : 6 (IRVMR)
प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. परमेश्वराची स्तुती करा.
❮
❯