स्तोत्रसंहिता 16 : 1 (IRVMR)
उत्तम वारसा दाविदाचे मिक्ताम (सुवर्णगीत) हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्यात आश्रय घेतला आहे.
स्तोत्रसंहिता 16 : 2 (IRVMR)
मी परमेश्वरास म्हणालो, “हे परमेश्वरा, तू माझा प्रभू आहेस, माझ्यामध्ये असलेला चांगुलपणा तुझ्याशिवाय काहीच नाही.”
स्तोत्रसंहिता 16 : 3 (IRVMR)
पृथ्वीवर जे पवित्र (संत) आहेत, ते थोर जन आहेत. त्यांच्यामध्ये माझा सर्व आनंद आहे.
स्तोत्रसंहिता 16 : 4 (IRVMR)
जे दुसऱ्या देवाला शोधतात, त्यांची दु:खे वाढवली जातील. त्यांच्या देवाला मी रक्ताची पेयार्पणे ओतणार नाही. किंवा त्यांचे नावसुद्धा आपल्या ओठाने घेणार नाही.
स्तोत्रसंहिता 16 : 5 (IRVMR)
परमेश्वरा, तू माझा निवडलेला भाग आणि माझा प्याला आहे. माझा वाटा तुच धरून ठेवतोस.
स्तोत्रसंहिता 16 : 6 (IRVMR)
माझ्या करिता सिमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत. खचित माझे वतन सुंदर आहे.
स्तोत्रसंहिता 16 : 7 (IRVMR)
मी परमेश्वराची स्तुती करतो, ज्याने मला मार्गदर्शन केले आहे, रात्रीच्या वेळी माझे मन मला शिकविते.
स्तोत्रसंहिता 16 : 8 (IRVMR)
मी परमेश्वरास नेहमी माझ्यासमोर ठेवतो म्हणून मी त्याच्या उजव्या हातातून कधीही ढळणार नाही.
स्तोत्रसंहिता 16 : 9 (IRVMR)
त्यामुळे माझे हृदय आनंदी आहे; माझे मन त्यास उंच करते. खचित माझा देह सुद्धा सुरक्षित राहतो.
स्तोत्रसंहिता 16 : 10 (IRVMR)
कारण तू माझ्या जीवाला मृतलोकांत राहू देणार नाही, ज्याच्याजवळ तुझी प्रेमदया आहे, त्यास तू अधोलोक पाहू देणार नाहीस.
स्तोत्रसंहिता 16 : 11 (IRVMR)
तू मला जीवनाचा मार्ग शिकवला, तुझ्या उपस्थितीत विपुल हर्ष आहे, तुझ्या उजव्या हातात सुख सर्वकाळ आहेत.
❮
❯