स्तोत्रसंहिता 17 : 1 (IRVMR)
{जुलूम करणाऱ्यांपासून संरक्षणासाठी प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, न्यायासाठी माझी विनवणी ऐक. माझ्या रडण्याकडे लक्ष दे! [QBR] माझ्या निष्कपट ओठातून जी प्रार्थना निघते तिच्याकडे कान दे. [QBR]
स्तोत्रसंहिता 17 : 2 (IRVMR)
तुझ्या उपस्थितीत माझा न्याय कर; जे खरे ते तुझे डोळे पाहोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 17 : 3 (IRVMR)
तू माझे हृदय पारखले आहे, रात्री तू झडती घेतली आहेस, [QBR] तू मला गाळून पाहिले आहे, तरी तुला काही सापडत नाही, माझे तोंड पाप करणार नाही असा निश्चय मी केला आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 17 : 4 (IRVMR)
मानवजातीच्या कृत्यांसंबंधित, तुझ्या ओठांच्या वचनांकडून मी आपणाला अनिष्ट करणाऱ्यांपासून राखले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 17 : 5 (IRVMR)
माझ्या पावलांनी तुझे मार्ग घट्ट धरले आहेत, माझे पाय घसरले नाहीत. [QBR]
स्तोत्रसंहिता 17 : 6 (IRVMR)
देवा, मी तुला हाक मारतो, कारण तू उत्तर देतोस, तुझे कान माझ्याकडे फिरव आणि माझे बोलने ऐक. [QBR]
स्तोत्रसंहिता 17 : 7 (IRVMR)
जो तू आपल्या उजव्या हाताने तुझ्यामध्ये आश्रय घेणाऱ्यास त्यांच्या शत्रूंपासून वाचवतो, तो तू तुझी आश्चर्यजनक प्रेमदया दाखव. [QBR]
स्तोत्रसंहिता 17 : 8 (IRVMR)
तुझ्या डोळ्यातल्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण कर; मला तुझ्या पंखाच्या सावलीखाली लपव. [QBR]
स्तोत्रसंहिता 17 : 9 (IRVMR)
वाईट लोक जे माझ्यावर हल्ला करतात, माझे शत्रू ज्यांनी मला घेरले आहे, त्यांच्यापासून माझे रक्षण कर. [QBR]
स्तोत्रसंहिता 17 : 10 (IRVMR)
त्यांना कोणाची दया येत नाही, त्यांचे मुख गर्वाने बोलते. [QBR]
स्तोत्रसंहिता 17 : 11 (IRVMR)
त्यांनी माझ्या पावलांना घेरले आहे, मला भूमीवर पाडावयास ते आपली दृष्टी लावत आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 17 : 12 (IRVMR)
एखाद्याचा बळी घेण्यास उत्सुक असणाऱ्या सिंहासारखे ते आहेत, जसा तरुण सिंह जो लपून बसला आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 17 : 13 (IRVMR)
परमेश्वरा, ऊठ! त्यांच्यावर हल्ला कर! त्यांच्या तोंडावर त्यांना पाड! तुझ्या तलवारीने तू माझा जीव दुष्टापासून वाचव. [QBR]
स्तोत्रसंहिता 17 : 14 (IRVMR)
परमेश्वरा, ज्यांचे वैभव या जीवनातच आहे, आणि ज्यांचे पोट तू आपल्या धनाने भरतोस, अशा मनुष्यांपासून तू आपल्या हाताने मला वाचव. [QBR] ते आपल्या संततीने तृप्त आहेत, आणि ते आपले उरलेले द्रव्य आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 17 : 15 (IRVMR)
मी न्यायीपणात तुझे मुख पाहीन, जेव्हा मी जागा होईन, तेव्हा तुझ्या दर्शनाने मी समाधानी होईन. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: