स्तोत्रसंहिता 18 : 1 (IRVMR)
{दाविदाचे गाइलेले मुक्तीगीत} [PS] “हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.” [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 2 (IRVMR)
परमेश्वर माझा खडक माझा गढ आहे, जो मला सुरक्षा देतो, तो माझा देव, माझा खडक आहे, त्याच्यात मी आश्रय घेतो. [QBR] तो माझी ढाल आहे, माझ्या तारणाचे शिंग आणि माझा बळकट दुर्ग आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 3 (IRVMR)
जो स्तुतीच्या योग्य आहे, त्या परमेश्वरास मी हाक मारीन, आणि मी माझ्या शत्रूंपासून वाचवला जाईन. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 4 (IRVMR)
मृत्यूच्या दोऱ्यांनी मला घेरीले, आणि नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 5 (IRVMR)
अधोलोकांच्या [* बन्यामीनी ] बंधनांनी मला घेरीले, मृत्यूच्या सापळ्याने मला अडकवले. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 6 (IRVMR)
मी संकटात असता, मी परमेश्वरास हाक मारली; मी देवाला माझ्या मदतीसाठी हाक मारली. त्याने त्याच्या पवित्र मंदिरातून माझी वाणी ऐकली. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 7 (IRVMR)
तेव्हा पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. डोंगरांचे पाये थरथर कापले आणि हादरले, [QBR] कारण देव क्रोधित झाला होता. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 8 (IRVMR)
त्याच्या नाकातून धूर वर चढला, आणि त्याच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाला निघाल्या, ज्याने कोळसे पेटले गेले. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 9 (IRVMR)
त्याने आकाश उघडले आणि तो खाली आला, आणि निबिड अंधार त्याच्या पाया खाली होता. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 10 (IRVMR)
तो करुबावर स्वार झाला आणि वाऱ्याच्या पंखांनी वर उडत गेला. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 11 (IRVMR)
पावसाचे मोठे काळोख असे मेघ त्याने त्याच्याभोवती तंबू असे केले, [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 12 (IRVMR)
त्याच्या समोरील तेजामुळे, गारा आणि जळते कोळसे बाहेर पडले. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 13 (IRVMR)
परमेश्वराने आकाशात गडगडाट केला! परात्पराने आवाज उंच केला, गारा आणि विजा बाहेर पडल्या. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 14 (IRVMR)
परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण उडाली, पुष्कळ विजांनी त्यांना छेदून टाकले. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 15 (IRVMR)
तेव्हा जलाशयाचे तळ दिसू लागले, तुझ्या युद्धाच्या गदारोळाने आणि तुझ्या नाकपुड्याच्या श्वासाच्या सोसाट्याने [QBR] हे परमेश्वरा, जगाचे पाये उघडे पडले. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 16 (IRVMR)
तो उंचावरून खाली आला आणि त्याने मला पकडले! त्याने मला उसळत्या पाण्यातून बाहेर काढले. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 17 (IRVMR)
माझ्या शक्तीशाली शत्रूंपासून आणि माझा तिरस्कार करणाऱ्यांपासून त्याने मला सोडवले. कारण ते माझ्यापेक्षा अधिक बलवान होते. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 18 (IRVMR)
माझ्या दु:खाच्या दिवशी ते माझ्याविरूद्ध आले; परंतु परमेश्वर मला उचलून धरणारा होता. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 19 (IRVMR)
त्याने मला विस्तृत खुल्या जागेमध्ये मोकळे केले! त्याने मला तारले कारण तो माझ्यामुळे संतुष्ट होता. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 20 (IRVMR)
माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने मला पुरस्कृत केले आहे, त्याने मला पुनसंचयित केले कारण माझे हात निर्मळ होते. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 21 (IRVMR)
कारण मी परमेश्वराच्या मार्गात राहिलो आणि दुष्टाईने देवापासून दूर फिरलो नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 22 (IRVMR)
कारण त्याचे धार्मिक नियम माझ्यापुढे होते आणि त्याचे नियम मी आपणापासून दूर केले नाहीत. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 23 (IRVMR)
मी त्याच्यासमोर निर्दोष असा होतो, आणि मी स्वत:ला पापापासून दूर राखले. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 24 (IRVMR)
माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने पुनसंचयित केले. कारण त्याच्या डोळ्यासमोर माझे हात निर्मळ होते. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 25 (IRVMR)
जो विश्वासयोग्य आहे, त्याच्याशी तू विश्वास दाखवतोस, [QBR] निर्दोष मनुष्याशी तू सात्विकतेने वागतोस. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 26 (IRVMR)
जे शुद्ध असतात त्यांच्याशी तू शुद्ध असतोस, परंतु जे कुटील त्यांच्याशी तू कुटीलतेने वागतोस. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 27 (IRVMR)
कारण तू पीडित लोकांस वाचविले आहेस. परंतु गर्वाने उंचावलेल्या डोळ्यांना तू खाली करतोस. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 28 (IRVMR)
कारण तू माझा दिवा लावशील, परमेश्वर माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करितो. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 29 (IRVMR)
कारण तुझ्या मदतीने मी फौजेविरूद्ध जाऊ शकतो, माझ्या देवाच्या योगे मी तटावरुन उडी मारून [† तट तुडवून] जाऊ शकतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 30 (IRVMR)
देवाचा मार्ग परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वचन शुद्ध आहे. [QBR] जे त्याच्यात आश्रय घेतात, त्यांच्यासाठी तो ढाल असा आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 31 (IRVMR)
कारण परमेश्वराखेरीज कोण देव आहे? आमच्या देवाशिवाय कोण खडक आहे? [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 32 (IRVMR)
तोच देव बलाने माझी कंबर बांधतो, जो माझे मार्ग सुरक्षित ठेवतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 33 (IRVMR)
तो माझे पाय हरिणीसारखे चपळ करतो आणि मला डोंगरावर ठेवतो! [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 34 (IRVMR)
तो माझ्या हाताला युद्ध करावयाला आणि माझे भुज पितळी धनुष्य वाकवायला शिकवतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 35 (IRVMR)
तू मला तुझ्या तारणाची ढाल दिली आहेस, तुझा उजवा हात मला आधार देतो आणि तुझ्या अनुग्रहाने मला थोर केले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 36 (IRVMR)
तू माझ्या पायांखाली विस्तीर्ण असे स्थान केले आहे, म्हणजे माझे पाय कधीही घसरणार नाहीत. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 37 (IRVMR)
मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करीन आणि त्यांना पकडीन. ते नाश होईपर्यंत मी मागे फिरणार नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 38 (IRVMR)
मी माझ्या शत्रूंना असे मारीन की, ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत, ते सगळे माझ्या पायाखाली असतील. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 39 (IRVMR)
कारण युद्धाकरिता तू सामर्थ्याने माझी कंबर बांधली आहे, जे माझ्याविरूद्ध उठले होते त्यांना तू खाली पाडले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 40 (IRVMR)
तू मला माझ्या शत्रूंनाही त्यांची पाठ फिरवायला लावली आहे, ज्यांनी माझा द्वेष केला, त्यांचा मी नाश केला. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 41 (IRVMR)
ते मदतीसाठी ओरडले, पण कोणीही त्यांना वाचवले नाही, त्यांनी परमेश्वरास आरोळी केली, पण त्याने उत्तर दिले नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 42 (IRVMR)
मी माझ्या शत्रूंचे वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे चूर्ण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना काढून टाकले. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 43 (IRVMR)
मी त्यांना असे मारले की धुळीसारखा त्यांचा भुगा केला, तू मला राष्ट्रांवर मस्तक असे केले आहे. जे लोक मला माहित नाहीत ते माझी सेवा करतील. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 44 (IRVMR)
ते लोक माझ्याविषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील, ते परदेशी माझ्यापुढे शरण येतील. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 45 (IRVMR)
ते परदेशी त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 46 (IRVMR)
परमेश्वर जिवंत आहे, माझा खडक धन्यवादित असो. माझ्या तारणाचा देव उंचावला जावो. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 47 (IRVMR)
हाच तो देव आहे जो माझ्यासाठी सूड घेतो, तो त्या राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली देतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 48 (IRVMR)
मी माझ्या शत्रूंपासून मुक्त झालो आहे, खचित, जे माझ्याविरूद्ध उठले आहेत, त्यांच्यावर तू मला उंच केले आहे. तू मला क्रूर मनुष्यांपासून वाचवले. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 49 (IRVMR)
यास्तव परमेश्वरा, राष्ट्रांमध्ये मी तुला धन्यवाद देईन, मी तुझ्या नावाची स्तुती गाईन. [QBR]
स्तोत्रसंहिता 18 : 50 (IRVMR)
देव आपल्या राजाला मोठा विजय देतो, आणि तो आपल्या अभिषिक्तावर, दाविदावर व त्याच्या संतानावर सदासर्वकाळ कृपा करतो. [PE]
❮
❯