स्तोत्रसंहिता 19 : 1 (IRVMR)
देवाची कृत्ये आणि त्याचे नियम मुख्य गायकासाठी. दाविदाचे स्तोत्र. आकाश देवाचा गौरव जाहीर करते, आणि अंतराळ त्याच्या हातचे कृत्य दाखविते.
स्तोत्रसंहिता 19 : 2 (IRVMR)
दिवस दिवसाशी बोलतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
स्तोत्रसंहिता 19 : 3 (IRVMR)
संभाषण नाही, बोललेले शब्दही नाही, त्यांचा आवाजही ऐकू येत नाही.
स्तोत्रसंहिता 19 : 4 (IRVMR)
तरी त्यांचे शब्द सर्व पृथ्वीभर जातात. आणि त्यांचे बोलणे जगाच्या शेवटापर्यंत जाते. त्याने सुर्यासाठी आकाशामध्ये मंडप उभारला आहे.
स्तोत्रसंहिता 19 : 5 (IRVMR)
सूर्य नवऱ्या मुलासारखा आपल्या मांडवातून बाहेर येतो. आणि सामर्थ्यवान पुरुषाप्रमाणे तो आपली धाव धावण्यात आनंद करतो.
स्तोत्रसंहिता 19 : 6 (IRVMR)
सूर्य एक क्षितीजापासून उदय होतो, आणि दुसऱ्या क्षितिजापर्यंत आकाशात पार जातो. त्याच्या उष्णतेपासून कोणाचीही सुटका होत नाही.
स्तोत्रसंहिता 19 : 7 (IRVMR)
परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते जीवाला पुर्नजीवित करणारे आहे. परमेश्वराचे नियम विश्वसनीय आहेत, ज्यांना अनुभव नाही त्यांना शहाणपण देणारे आहे.
स्तोत्रसंहिता 19 : 8 (IRVMR)
परमेश्वराच्या सूचना खऱ्या आहेत. जे हृदयाला हर्षीत करतात. परमेश्वराच्या कराराचे नियम शुद्ध आहेत, ते डोळे प्रकाशवनारे आहेत.
स्तोत्रसंहिता 19 : 9 (IRVMR)
परमेश्वराची भीती शुद्ध आहे, ती सर्वकाळ टिकणारे आहे, परमेश्वराचे नियम खरे आहेत, आणि सर्व न्यायी आहेत.
स्तोत्रसंहिता 19 : 10 (IRVMR)
ते सोन्यापेक्षा ही मौल्यवान आहेत. अती उत्तम सोन्यापेक्षाही ते शुद्ध आहेत. ते मधाच्या पोळ्यातून गळणाऱ्या, मधापेक्षाही गोड आहेत.
स्तोत्रसंहिता 19 : 11 (IRVMR)
होय, त्याकडून तुझ्या सेवकाला चेतावनी मिळते. ते पाळण्याने उत्तम प्रतिफळ मिळते.
स्तोत्रसंहिता 19 : 12 (IRVMR)
आपल्या स्वत:च्या चुका कोण ओळखू शकतो? माझ्या गुप्त दोषांची मला क्षमा कर.
स्तोत्रसंहिता 19 : 13 (IRVMR)
तुझ्या सेवकाला जाणूनबुजून केलेल्या पापापासून राख; ती माझ्यावर राज्य न गाजवोत. तेव्हा मी परिपूर्ण होईल, आणि माझ्या पुष्कळ अपराधांपासून निर्दोष राहीन.
स्तोत्रसंहिता 19 : 14 (IRVMR)
माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्यासमोर मान्य असोत. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस, मला तारणारा तूच आहेस.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14