स्तोत्रसंहिता 2 : 1 (IRVMR)
परमेश्वराच्या अभिषिक्ताचे राज्य राष्ट्रे का बंडखोर झाली आहेत, आणि लोक व्यर्थच का कट रचत आहेत?
स्तोत्रसंहिता 2 : 2 (IRVMR)
पृथ्वीचे राजे परमेश्वराविरूद्ध व त्याच्या अभिषिक्त्याविरूद्ध एकत्र उभे झाले आहेत, आणि राज्यकर्ते एकत्र मिळून कट रचत आहेत, ते म्हणतात.
स्तोत्रसंहिता 2 : 3 (IRVMR)
चला, आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू, जे त्यांनी आपणावर लादल्या होत्या. आणि त्यांचे साखळदंड फेकून देऊ.
स्तोत्रसंहिता 2 : 4 (IRVMR)
परंतु तो जो आकाशांत बसलेला आहे तो हसेल, प्रभू त्यांचा उपहास करेल.
स्तोत्रसंहिता 2 : 5 (IRVMR)
तेव्हा तो आपल्या रागात त्यांच्याशी बोलेल, आणि आपल्या संतापाने त्यांना घाबरे करील.
स्तोत्रसंहिता 2 : 6 (IRVMR)
मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर* हे नाव मारिया डोंगरावरील एका टेकडीला देण्यात आले होते ज्यावर शलमोन राजाने मंदिर बांधले , माझ्या राजास अभिषेक केला आहे.
स्तोत्रसंहिता 2 : 7 (IRVMR)
मी परमेश्वराचा फर्मान घोषीत करीन, तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस.” या दिवशी मी तुझा पिता झालो आहे.
स्तोत्रसंहिता 2 : 8 (IRVMR)
मला माग, आणि मी तुला राष्ट्रे तुझे वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझ्या ताब्यात देईल.
स्तोत्रसंहिता 2 : 9 (IRVMR)
लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील, कुंभाराच्या भांड्यासारखा तू त्यांना फोडशील.
स्तोत्रसंहिता 2 : 10 (IRVMR)
म्हणून आता, अहो राजांनो, सावध व्हा; पृथ्वीच्या राज्यकर्त्यांनो, चूक दुरुस्त करा.
स्तोत्रसंहिता 2 : 11 (IRVMR)
भय धरून परमेश्वराची स्तुती करा आणि थरथर कापून हर्ष करा.
स्तोत्रसंहिता 2 : 12 (IRVMR)
आणि तो तुमच्यावर रागावू नये, ह्यासाठी देवाच्या पुत्रास खरी निष्ठा द्या, म्हणजे तुम्ही मरणार नाही. कारण देवाचा क्रोध त्वरीत पेटेल. जे सर्व त्याच्याठायी आश्रय घेतात ते आशीर्वादीत आहेत.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12