स्तोत्रसंहिता 20 : 1 (IRVMR)
{विजयासाठी प्रार्थना} [PS] परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो, [QBR] याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो. [QBR]
स्तोत्रसंहिता 20 : 2 (IRVMR)
देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो. तो तुम्हास सियोनातून साहाय्य करो. [QBR]
स्तोत्रसंहिता 20 : 3 (IRVMR)
तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो, [QBR] आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो. [QBR]
स्तोत्रसंहिता 20 : 4 (IRVMR)
तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो, [QBR] आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो. [QBR]
स्तोत्रसंहिता 20 : 5 (IRVMR)
तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू. [QBR] आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू. [QBR] परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो. [QBR]
स्तोत्रसंहिता 20 : 6 (IRVMR)
परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मी जाणले आहे. [QBR] त्याच्या तारण करणाऱ्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने, [QBR] तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्यास उत्तर देईल. [QBR]
स्तोत्रसंहिता 20 : 7 (IRVMR)
काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर, [QBR] परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू. [QBR]
स्तोत्रसंहिता 20 : 8 (IRVMR)
ते खाली आणले गेले आणि पडले, [QBR] परंतु आम्ही उठू आणि ताठ उभे राहू! [QBR]
स्तोत्रसंहिता 20 : 9 (IRVMR)
हे परमेश्वरा तारण कर, आम्ही आरोळी करू त्या दिवशी राजा आम्हांला उत्तर देवो. [PE]
❮
❯