स्तोत्रसंहिता 23 : 1 (IRVMR)
परमेश्वर माझा मेंढपाळ दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे* यहोवा-रोही , मला कशाचीही उणीव भासणार नाही.
स्तोत्रसंहिता 23 : 2 (IRVMR)
तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
स्तोत्रसंहिता 23 : 3 (IRVMR)
तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.
स्तोत्रसंहिता 23 : 4 (IRVMR)
मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.
स्तोत्रसंहिता 23 : 5 (IRVMR)
तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. माझा प्याला भरुन वाहत आहे.
स्तोत्रसंहिता 23 : 6 (IRVMR)
खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.
❮
❯