स्तोत्रसंहिता 24 : 1 (IRVMR)
गौरवाचा राजा दाविदाचे स्तोत्र. भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत.
स्तोत्रसंहिता 24 : 2 (IRVMR)
कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला, आणि जलांवर त्याने ती स्थापली.
स्तोत्रसंहिता 24 : 3 (IRVMR)
परमेश्वराच्या * सियोन पर्वत डोंगरावर कोण चढेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू आराधना करू शकतो?
स्तोत्रसंहिता 24 : 4 (IRVMR)
ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही.
स्तोत्रसंहिता 24 : 5 (IRVMR)
तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल, आणि त्यालाच त्याच्या तारणाऱ्या देवापासून न्यायीपण मिळेल.
स्तोत्रसंहिता 24 : 6 (IRVMR)
हिच पिढी त्यास शोधणारी आहे, जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते.
स्तोत्रसंहिता 24 : 7 (IRVMR)
अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा. पुर्वकालीन द्वारांनो, उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.
स्तोत्रसंहिता 24 : 8 (IRVMR)
गौरवशाली राजा कोण आहे? तोच परमेश्वर, सामर्थ्यशाली आणि थोर आहे.
स्तोत्रसंहिता 24 : 9 (IRVMR)
वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. सर्वकाळच्या दरवाजांनो, तुम्ही उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.
स्तोत्रसंहिता 24 : 10 (IRVMR)
तो गौरवशाली राजा कोण आहे? सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे, तोच तो गौरवशाली राजा आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10