स्तोत्रसंहिता 25 : 1 (IRVMR)
मार्गदर्शन, क्षमा आणि संरक्षण ह्यांसाठी प्रार्थना दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
स्तोत्रसंहिता 25 : 2 (IRVMR)
माझ्या देवा, तुझ्यात माझा विश्वास आहे. मला निराश होऊ देऊ नको, माझे शत्रू माझ्यावर हर्ष न करोत.
स्तोत्रसंहिता 25 : 3 (IRVMR)
तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही. परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील.
स्तोत्रसंहिता 25 : 4 (IRVMR)
हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव, मला तुझे मार्ग शिकव.
स्तोत्रसंहिता 25 : 5 (IRVMR)
तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव. कारण तू माझा तारणारा देव आहेस मी रोज तुझी वाट पाहतो.
स्तोत्रसंहिता 25 : 6 (IRVMR)
हे परमेश्वरा, तुझ्या दयाळू कृत्यांची आणि प्रेमदयेची आठवण कर.
स्तोत्रसंहिता 25 : 7 (IRVMR)
हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको. तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर.
स्तोत्रसंहिता 25 : 8 (IRVMR)
परमेश्वर चांगला आणि प्रामाणिक आहे. यास्तव तो पाप्यांस मार्ग शिकवतो.
स्तोत्रसंहिता 25 : 9 (IRVMR)
तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो. आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो.
स्तोत्रसंहिता 25 : 10 (IRVMR)
जे त्याचे करार आणि वचने पाळतात त्यांच्यासाठी परमेश्वराचे मार्ग प्रेमदया व विश्वासयोग्य आहेत.
स्तोत्रसंहिता 25 : 11 (IRVMR)
परमेश्वरा, तुझ्या नामास्तव, माझ्या अपराधांची क्षमा कर, कारण ते खूप आहेत.
स्तोत्रसंहिता 25 : 12 (IRVMR)
परमेश्वराचे भय धरतो असा मनुष्य कोण आहे? प्रभू त्यास सूचना देईल, की त्याने कोणते मार्ग निवडावे.
स्तोत्रसंहिता 25 : 13 (IRVMR)
त्याचे जीवन चांगुलपणात जाईल, आणि त्याची संतान भूमीचे वतन पावतील.
स्तोत्रसंहिता 25 : 14 (IRVMR)
परमेश्वराचे सत्य त्याचे अनुकरण करणाऱ्यांबरोबर असते. आणि तो त्याचे करार कळवतो.
स्तोत्रसंहिता 25 : 15 (IRVMR)
मी नेहमी परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो. कारण तो माझे पाय जाळ्यातून मुक्त करतो.
स्तोत्रसंहिता 25 : 16 (IRVMR)
परमेश्वरा माझ्याकडे फिर आणि माझ्यावर दया कर. कारण मी एकटा आणि पीडलेला आहे.
स्तोत्रसंहिता 25 : 17 (IRVMR)
माझ्या हृदयाचा त्रास वाढला आहे, संकटातून मला तू काढ.
स्तोत्रसंहिता 25 : 18 (IRVMR)
परमेश्वरा, माझे दु:ख आणि कष्ट बघ, माझ्या सर्व पापांची क्षमा कर.
स्तोत्रसंहिता 25 : 19 (IRVMR)
माझ्या सर्व शत्रूंकडे पाहा, कारण ते पुष्कळ आहेत. ते माझा कठोरपणे तिरस्कार करतात.
स्तोत्रसंहिता 25 : 20 (IRVMR)
देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करू नकोस.
स्तोत्रसंहिता 25 : 21 (IRVMR)
तुझा प्रामाणिकपणा आणि सरळपणा माझे रक्षण करोत. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे.
स्तोत्रसंहिता 25 : 22 (IRVMR)
देवा, इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या सर्व त्रासांपासून सोडव.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22