स्तोत्रसंहिता 26 : 1 (IRVMR)
{सात्त्विकतेचा दावा} [PS] हे परमेश्वरा, माझा न्याय कर. कारण मी प्रामाणिकपणाने चाललो आहे. [QBR] मी परमेश्वरावर न डगमगता विश्वास ठेवला आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 26 : 2 (IRVMR)
हे परमेश्वरा, मला पारख आणि माझे परिक्षण कर. [QBR] माझ्ये हृदय आणि आतील मन निरखून पाहा. [QBR]
स्तोत्रसंहिता 26 : 3 (IRVMR)
कारण तुझी प्रेमदया सदैव माझ्या डोळ्यांपुढे आहे, [QBR] आणि मी तुझ्या सत्यात चाललो आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 26 : 4 (IRVMR)
कपटी लोकांबरोबर मी सहयोगी झालो नाही, [QBR] किंवा मी अप्रामाणिक लोकांत मिसळलो नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 26 : 5 (IRVMR)
मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो. [QBR] आणि मी दुष्टांसोबत राहत नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 26 : 6 (IRVMR)
मी आपले हात निर्दोषतेने धुईन, [QBR] आणि परमेश्वरा मी तुझ्या वेदीकडे वळीन. [QBR]
स्तोत्रसंहिता 26 : 7 (IRVMR)
अशासाठी की, मी तुझी स्तुती मोठ्याने करावी [QBR] आणि तू केलेल्या आश्चर्याची कृत्ये सांगावी. [QBR]
स्तोत्रसंहिता 26 : 8 (IRVMR)
परमेश्वरा, तुझे राहण्याचे घर आणि [QBR] तुझे गौरव जिथे असते, ते घर मला आवडते. [QBR]
स्तोत्रसंहिता 26 : 9 (IRVMR)
पाप्यांसोबत किंवा रक्तपात करणाऱ्यांसोबत माझा प्राण काढून घेऊ नकोस. [QBR]
स्तोत्रसंहिता 26 : 10 (IRVMR)
त्यांच्या हातात कट आहे, [QBR] आणि त्यांचा उजवा हात लाच घेण्याने भरला आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 26 : 11 (IRVMR)
पण मी तर प्रामाणिकपणाने वागेन, [QBR] माझ्यावर दया कर आणि मला तार. [QBR]
स्तोत्रसंहिता 26 : 12 (IRVMR)
माझा पाय सपाट ठिकाणी उभा आहे, [QBR] सभेमध्ये मी परमेश्वराची स्तुती करीन. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: