स्तोत्रसंहिता 29 : 1 (IRVMR)
तुफानात परमेश्वराची वाणी दाविदाचे स्तोत्र. स्वर्गदूतहो, परमेश्वरास गौरव आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा.
स्तोत्रसंहिता 29 : 2 (IRVMR)
परमेश्वरास त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या; पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
स्तोत्रसंहिता 29 : 3 (IRVMR)
परमेश्वराचा आवाज जलांवरून ऐकण्यात आला, गौरवशाली देव गर्जत आहे, परमेश्वर पुष्कळ जलांवर गर्जत आहे.
स्तोत्रसंहिता 29 : 4 (IRVMR)
परमेश्वराचा आवाज सामर्थशाली आहे, परमेश्वराचा आवाज चमत्कारीक आहे.
स्तोत्रसंहिता 29 : 5 (IRVMR)
परमेश्वराची वाणी देवदार वृक्षाला तोडते, परमेश्वर लबानोनाच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
स्तोत्रसंहिता 29 : 6 (IRVMR)
तो लबानोनला वासराप्रमाणे आणि सिर्योनला तरुण बैलाप्रमाणे बागडायला लावतो.
स्तोत्रसंहिता 29 : 7 (IRVMR)
परमेश्वराची वाणी अग्नी ज्वालासह हल्ला करते.
स्तोत्रसंहिता 29 : 8 (IRVMR)
परमेश्वराची वाणी वाळवंटाला कंपित करते कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते.
स्तोत्रसंहिता 29 : 9 (IRVMR)
परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते आणि अरण्य पर्णहीन करते. पण त्याच्या मंदिरात सर्व “महिमा!” गातात
स्तोत्रसंहिता 29 : 10 (IRVMR)
महापुरावर परमेश्वर राजा बसला आहे, आणि परमेश्वरच सर्वकाळचा राजा म्हणून बसला आहे.
स्तोत्रसंहिता 29 : 11 (IRVMR)
परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो, परमेश्वर त्याच्या लोकांना शांतीने आशीर्वादित करतो.
❮
❯