स्तोत्रसंहिता 3 : 1 (IRVMR)
प्राप्तःकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना *दावीदाचे स्तोत्र; जेव्हा तो आपला मुलगा अबशालोम याच्यापुढून पळाला. *परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत! पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे.
स्तोत्रसंहिता 3 : 2 (IRVMR)
“परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,” असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. QSS सेला SE * अल्पविराम
स्तोत्रसंहिता 3 : 3 (IRVMR)
परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे.
स्तोत्रसंहिता 3 : 4 (IRVMR)
मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. QSS सेला SE
स्तोत्रसंहिता 3 : 5 (IRVMR)
मी अंग टाकून झोपी गेलो; मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो.
स्तोत्रसंहिता 3 : 6 (IRVMR)
जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही.
स्तोत्रसंहिता 3 : 7 (IRVMR)
हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार! कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस, तू दुष्टांचे दात पाडले आहेत.
स्तोत्रसंहिता 3 : 8 (IRVMR)
तारण विजय परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. QSS सेला. SE

1 2 3 4 5 6 7 8