स्तोत्रसंहिता 33 : 1 (IRVMR)
उत्पन्नकर्त्याची व संरक्षकाची महती न्यायी जनहो! परमेश्वरामध्ये आनंद करा, न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 33 : 2 (IRVMR)
वीणा वाजवून परमेश्वरास धन्यवाद द्या; दहा तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा.
स्तोत्रसंहिता 33 : 3 (IRVMR)
त्याच्यासाठी नवे गीत गा; मोठा आवाज करून कौशल्याने वाद्ये वाजवा.
स्तोत्रसंहिता 33 : 4 (IRVMR)
कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे, आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो.
स्तोत्रसंहिता 33 : 5 (IRVMR)
देवाला चांगलुपणा आणि न्यायीपण प्रिय आहे, परमेश्वराच्या प्रेमदयेने पृथ्वी भरलेली आहे.
स्तोत्रसंहिता 33 : 6 (IRVMR)
परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत.
स्तोत्रसंहिता 33 : 7 (IRVMR)
तो समुद्रातील पाणी ढीगासारखे एकत्र करतो, तो समुद्र कोठारामध्ये ठेवतो.
स्तोत्रसंहिता 33 : 8 (IRVMR)
सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो, जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो.
स्तोत्रसंहिता 33 : 9 (IRVMR)
कारण तो बोलला आणि ते झाले, त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले.
स्तोत्रसंहिता 33 : 10 (IRVMR)
राष्ट्रांचा उपदेश परमेश्वर मोडतो, तो लोकांच्या योजनांवर अधिकार करतो.
स्तोत्रसंहिता 33 : 11 (IRVMR)
परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाळ राहतात, त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात.
स्तोत्रसंहिता 33 : 12 (IRVMR)
परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे. ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत.
स्तोत्रसंहिता 33 : 13 (IRVMR)
परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो, तो सर्व लोकांस पाहातो.
स्तोत्रसंहिता 33 : 14 (IRVMR)
तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो.
स्तोत्रसंहिता 33 : 15 (IRVMR)
ज्याने सर्वांची हृदये घडवली तो त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे.
स्तोत्रसंहिता 33 : 16 (IRVMR)
पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही. वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही.
स्तोत्रसंहिता 33 : 17 (IRVMR)
घोडा विजयासाठी व्यर्थ आहे. त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही.
स्तोत्रसंहिता 33 : 18 (IRVMR)
पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात,
स्तोत्रसंहिता 33 : 19 (IRVMR)
त्यांना मरणापासून, आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे.
स्तोत्रसंहिता 33 : 20 (IRVMR)
आम्ही परमेश्वराची वाट पाहू, तो आमचे साहाय्य आणि आमची ढाल आहे.
स्तोत्रसंहिता 33 : 21 (IRVMR)
त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते, कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो.
स्तोत्रसंहिता 33 : 22 (IRVMR)
परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हाबरोबर असू दे.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22