स्तोत्रसंहिता 34 : 1 (IRVMR)
पीडेपासून झालेल्या मुक्ततेबद्दल उपकारस्तुती *दाविदाचे स्तोत्र; त्याने अबीमलेखापुढे आपली चर्या बदलल्यावर त्यास त्याने हाकलून लावले, आणि तो तेथून निघून गेला तेव्हाचे त्याचे गीत. *मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन. माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.
स्तोत्रसंहिता 34 : 2 (IRVMR)
मी परमेश्वराची स्तुती करणार, विनम्र ऐकतील आणि आनंद करतील.
स्तोत्रसंहिता 34 : 3 (IRVMR)
तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या. आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावू या.
स्तोत्रसंहिता 34 : 4 (IRVMR)
मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले. आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला.
स्तोत्रसंहिता 34 : 5 (IRVMR)
जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील, आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 34 : 6 (IRVMR)
या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले.
स्तोत्रसंहिता 34 : 7 (IRVMR)
परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो. आणि त्यास वाचवतो.
स्तोत्रसंहिता 34 : 8 (IRVMR)
परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.
स्तोत्रसंहिता 34 : 9 (IRVMR)
जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही.
स्तोत्रसंहिता 34 : 10 (IRVMR)
तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.
स्तोत्रसंहिता 34 : 11 (IRVMR)
मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.
स्तोत्रसंहिता 34 : 12 (IRVMR)
सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे?
स्तोत्रसंहिता 34 : 13 (IRVMR)
तर वाईट बोलण्यापासून आवर, आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.
स्तोत्रसंहिता 34 : 14 (IRVMR)
वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर. शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग.
स्तोत्रसंहिता 34 : 15 (IRVMR)
परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे, त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.
स्तोत्रसंहिता 34 : 16 (IRVMR)
परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्याविरुध्द आहे. तो त्यांची आठवण पृथ्वीतून नाश करतो.
स्तोत्रसंहिता 34 : 17 (IRVMR)
नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.
स्तोत्रसंहिता 34 : 18 (IRVMR)
जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो.
स्तोत्रसंहिता 34 : 19 (IRVMR)
नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल.
स्तोत्रसंहिता 34 : 20 (IRVMR)
परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांतले एकही हाड तो मोडू देणार नाही.
स्तोत्रसंहिता 34 : 21 (IRVMR)
परंतु दुष्टाई दुष्टाला मारुन टाकील, जो नितीमानाचा द्वेष करतो तो दोषी ठरवला जाईल.
स्तोत्रसंहिता 34 : 22 (IRVMR)
परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्यांना तारेल. त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22