स्तोत्रसंहिता 35 : 1 (IRVMR)
शत्रूंच्या हातून सुटण्यासाठी प्रार्थना दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर. जे माझ्याविरूद्ध लढतात त्यांच्याविरुद्ध तू लढ.
स्तोत्रसंहिता 35 : 2 (IRVMR)
तुझी मोठी आणि छोटी ढाल घे, उठून मला मदत कर.
स्तोत्रसंहिता 35 : 3 (IRVMR)
जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर. माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणारा आहे.
स्तोत्रसंहिता 35 : 4 (IRVMR)
जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत, ते लाजवले जावो आणि अप्रतिष्ठीत होवोत. जे माझे वाईट योजितात ते मागे फिरले जावोत व गोंधळले जावोत.
स्तोत्रसंहिता 35 : 5 (IRVMR)
ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे होवोत आणि परमेश्वराचा दूत त्यांना पळवून लावो.
स्तोत्रसंहिता 35 : 6 (IRVMR)
त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करो.
स्तोत्रसंहिता 35 : 7 (IRVMR)
विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे.
स्तोत्रसंहिता 35 : 8 (IRVMR)
त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो, त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे. त्यांच्याच नाशात ते पडोत.
स्तोत्रसंहिता 35 : 9 (IRVMR)
परंतु मी परमेश्वराच्या ठायी आनंदी असेन, आणि त्याच्या तारणात मी हर्ष करीन.
स्तोत्रसंहिता 35 : 10 (IRVMR)
माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? जो तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. आणि गरीबांना आणि गरजवंताना त्याच्या लुटणाऱ्यांपासून सोडवतो.
स्तोत्रसंहिता 35 : 11 (IRVMR)
अनितीमान साक्षी उठल्या आहेत; ते माझ्यावर खोटा आरोप लावतात.
स्तोत्रसंहिता 35 : 12 (IRVMR)
माझ्या चांगल्या बद्दल ते मला वाईट परत फेड करतात. मी दु:खी आहे.
स्तोत्रसंहिता 35 : 13 (IRVMR)
परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, मी त्यांच्या करता उपवास केला, मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही.
स्तोत्रसंहिता 35 : 14 (IRVMR)
मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे. मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे.
स्तोत्रसंहिता 35 : 15 (IRVMR)
परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला. मला माहित नसता ते माझ्याविरूद्ध एकत्र जमले.
स्तोत्रसंहिता 35 : 16 (IRVMR)
आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली. त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले.
स्तोत्रसंहिता 35 : 17 (IRVMR)
परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव.
स्तोत्रसंहिता 35 : 18 (IRVMR)
मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन.
स्तोत्रसंहिता 35 : 19 (IRVMR)
माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको.
स्तोत्रसंहिता 35 : 20 (IRVMR)
कारण ते शांतीने बोलत नाही, परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात.
स्तोत्रसंहिता 35 : 21 (IRVMR)
ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात, ते म्हणतात, अहाहा, अहाहा, आमच्या डोळ्यांने हे पाहिले आहे.
स्तोत्रसंहिता 35 : 22 (IRVMR)
हे परमेश्वरा, तू हे पाहिले आहेस? तर शांत राहू नको. देवा, माझ्यापासून दूर राहू नको.
स्तोत्रसंहिता 35 : 23 (IRVMR)
हे देवा, माझ्या प्रभू, ऊठ, माझ्या न्यायासाठी आणि वादासाठी लढ.
स्तोत्रसंहिता 35 : 24 (IRVMR)
परमेश्वरा माझ्या देवा, माझे रक्षण कर, तुझ्या न्यायीपणामुळे, त्यांना माझ्यावर हर्ष नको करू देऊ.
स्तोत्रसंहिता 35 : 25 (IRVMR)
“आम्हांला हवे होते ते मिळाले,” असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ. “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 35 : 26 (IRVMR)
जे माझ्या वाईटावर उठले आहेत, ते सगळे लज्जीत होवो आणि गोंधळून जावो. जे माझी थट्टा करतात ते लज्जेत आणि अप्रतिष्ठेत झाकले जावो.
स्तोत्रसंहिता 35 : 27 (IRVMR)
जे माझ्या इच्छेला समर्थन करतात ते हर्षनाद करोत आणि आनंदी होवोत. जे आपल्या सेवकाच्या कल्याणात हर्ष पावतात, परमेश्वराची स्तुती असो, असे ते सतत म्हणोत.
स्तोत्रसंहिता 35 : 28 (IRVMR)
तेव्हा मी तुझ्या न्यायाबद्दल सांगेन, आणि तुझी स्तुती दिवसभर करीन.
❮
❯