स्तोत्रसंहिता 36 : 1 (IRVMR)
देवाचे अढळ प्रेम *प्रमुख गायकासाठी; परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र. *दुष्टाचा अपराध त्याच्या हृदयात सांगत असतो की, त्याच्या दृष्टीत देवाचे काही भय नाही.
स्तोत्रसंहिता 36 : 2 (IRVMR)
त्याचे अपराध उघडकीस येणार नाही आणि त्याचा द्वेष केला जाणार नाही, अशा भ्रमात तो राहत असतो.
स्तोत्रसंहिता 36 : 3 (IRVMR)
त्याचे शब्द कपटी आणि पापमय असतात. तो शहाणा होण्यास किंवा सत्कृत्ये करण्यास इच्छीत नाही.
स्तोत्रसंहिता 36 : 4 (IRVMR)
तो आपल्या बिछान्यावर पडून असता, तो अपराधाच्या योजना आखतो. तो वाईट मार्गाच्या योजना करतो, तो वाईटाचा धिक्कार करत नाही.
स्तोत्रसंहिता 36 : 5 (IRVMR)
हे परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे; तुझी एकनिष्ठता आभाळापर्यंत पोहचली आहे.
स्तोत्रसंहिता 36 : 6 (IRVMR)
परमेश्वरा तुझे न्यायीपण उंच पर्वतासारखे आहे. तुझा न्याय खोल समुद्रासारखा आहे. परमेश्वरा तू मनुष्यास आणि प्राण्यांस दोघांस राखतो.
स्तोत्रसंहिता 36 : 7 (IRVMR)
देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे. मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते.
स्तोत्रसंहिता 36 : 8 (IRVMR)
ते तुझ्या घरातल्या समृद्धीमुळे तृप्त होतील. तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोक्त पिण्यास देशील.
स्तोत्रसंहिता 36 : 9 (IRVMR)
कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशात आम्ही प्रकाश पाहू.
स्तोत्रसंहिता 36 : 10 (IRVMR)
राजे तुला ओळखतात त्यांच्याकरिता तू आपली प्रेमदया विस्तीर्ण कर, तुझी सुरक्षितता सरळांसोबत असू दे.
स्तोत्रसंहिता 36 : 11 (IRVMR)
गर्विष्ठांचे पाय माझ्याजवळ येऊ देऊ नकोस. दुष्टाचा हात मला घालवून न देवो.
स्तोत्रसंहिता 36 : 12 (IRVMR)
तेथे दुष्ट पडले आहेत, ते पाडले गेले आहेत आणि ते कधीही उभे राहू शकणार नाहीत.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12