स्तोत्रसंहिता 37 : 1 (IRVMR)
दुष्ट व देवभक्त ह्यांचे भवितव्य दाविदाचे स्तोत्र. दुष्टकृत्ये करणाऱ्यांवर चिडू नकोस, जे अनीतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस.
स्तोत्रसंहिता 37 : 2 (IRVMR)
कारण ते लवकरच गवतासारखे वाळून जातील; व हिरव्या वनस्पतीसारखे सुकून जातील.
स्तोत्रसंहिता 37 : 3 (IRVMR)
परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर; देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर.
स्तोत्रसंहिता 37 : 4 (IRVMR)
परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.
स्तोत्रसंहिता 37 : 5 (IRVMR)
तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.
स्तोत्रसंहिता 37 : 6 (IRVMR)
तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
स्तोत्रसंहिता 37 : 7 (IRVMR)
परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा. जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, तर काळजी करू नको.
स्तोत्रसंहिता 37 : 8 (IRVMR)
रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो.
स्तोत्रसंहिता 37 : 9 (IRVMR)
कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.
स्तोत्रसंहिता 37 : 10 (IRVMR)
थोड्याच काळात दुष्ट नाहीसे होतील; तू त्यांच्या ठिकाणाकडे बघशील, परंतु ते सापडणार नाहीस.
स्तोत्रसंहिता 37 : 11 (IRVMR)
परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील, आणि मोठ्या समृद्धित ते हर्ष करतील.
स्तोत्रसंहिता 37 : 12 (IRVMR)
दुष्ट मनुष्य नितीमानाच्या विरोधात योजना आखतो, आणि त्याच्याविरुध्द आपले दातओठ खातो.
स्तोत्रसंहिता 37 : 13 (IRVMR)
प्रभू त्यास हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे.
स्तोत्रसंहिता 37 : 14 (IRVMR)
जे पीडलेले आणि गरजवंत आणि जे सरळ आहेत, त्यांना ठार मारण्यास दुष्टांनी आपली तलवार उपसली आहे आणि आपले धनुष्य वाकविले आहेत.
स्तोत्रसंहिता 37 : 15 (IRVMR)
परंतु त्यांचे धनुष्य मोडले जातील व त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदतील.
स्तोत्रसंहिता 37 : 16 (IRVMR)
अनेक दुष्ट लोकांच्या विपुलतेपेक्षा, नितीमानाकडे जे थोडे ते उत्तम आहे.
स्तोत्रसंहिता 37 : 17 (IRVMR)
कारण दुष्ट लोकांचे बाहू मोडले जातील परंतु परमेश्वर नितीमानांना आधार देईल.
स्तोत्रसंहिता 37 : 18 (IRVMR)
परमेश्वर निर्दोषास दिवसेन दिवस बघतो, आणि त्यांचे वतन सदैव राहील.
स्तोत्रसंहिता 37 : 19 (IRVMR)
वाईट समयी ते लज्जीत होणार नाहीत. जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल.
स्तोत्रसंहिता 37 : 20 (IRVMR)
परंतु दुष्ट मनुष्य नाश पावतील, परमेश्वराचे शत्रू कुरणाच्या शोभेसारखे होतील; ते नाश होतील आणि धुरामध्ये नाहीसे होतील.
स्तोत्रसंहिता 37 : 21 (IRVMR)
दुष्ट पैसे उसने घेतो परंतु त्याची परत फेड करत नाही. परंतु नितीमान मनुष्य उदारतेने देतो.
स्तोत्रसंहिता 37 : 22 (IRVMR)
जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत, ते भूमीचे वतन पावतील; आणि जे त्याच्याकडून शापित आहेत, ते छेदून टाकले जातील.
स्तोत्रसंहिता 37 : 23 (IRVMR)
मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात, असा मनुष्य ज्याचे मार्ग देवाच्या दृष्टीने प्रशंसनीय असतात.
स्तोत्रसंहिता 37 : 24 (IRVMR)
जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही. कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील.
स्तोत्रसंहिता 37 : 25 (IRVMR)
मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे; तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही.
स्तोत्रसंहिता 37 : 26 (IRVMR)
सारा दिवस तो दयाळूपणाने वागतो आणि उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते.
स्तोत्रसंहिता 37 : 27 (IRVMR)
वाईटापासून फिर आणि चांगले ते कर. तेव्हा तू सर्वकाळासाठी वाचवला जाशील.
स्तोत्रसंहिता 37 : 28 (IRVMR)
कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे आणि तो विश्वासाने त्याच्यामागे चालणाऱ्यांस सोडत नाही. ते सर्वकाळासाठी राखून ठेवलेले आहेत. परंतु दुष्टाचे वंशज छेदले जातील.
स्तोत्रसंहिता 37 : 29 (IRVMR)
नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील.
स्तोत्रसंहिता 37 : 30 (IRVMR)
नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते, आणि न्याय वाढवते.
स्तोत्रसंहिता 37 : 31 (IRVMR)
त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते, त्याचे पाय कधी घसरणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 37 : 32 (IRVMR)
परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो, आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो.
स्तोत्रसंहिता 37 : 33 (IRVMR)
परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही. किंवा जेव्हा त्याचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही.
स्तोत्रसंहिता 37 : 34 (IRVMR)
परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ. आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल. जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील.
स्तोत्रसंहिता 37 : 35 (IRVMR)
मी विस्तारलेल्या आणि सशक्त झाडासारखा एक दुष्ट मनुष्य पाहिला. जो आपले मूळ जमिनीत पसरवतो.
स्तोत्रसंहिता 37 : 36 (IRVMR)
परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पुन्हा गेलो, तर तो तेथे नव्हता. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही.
स्तोत्रसंहिता 37 : 37 (IRVMR)
प्रमाणिक माणसाकडे लक्ष लाव आणि सरळास निशाणी लाव. कारण शांततेत राहण्याऱ्या मनुष्याचे भविष्य चांगले असते.
स्तोत्रसंहिता 37 : 38 (IRVMR)
पापी तर पूर्णपणे नाश पावतील, परंतू दुष्टाचा भावीकाळ छेदून टाकला जाईल.
स्तोत्रसंहिता 37 : 39 (IRVMR)
नितीमानाचे तारण हे परमेश्वराकडून येते, संकटसमयी तो त्यांचे रक्षण करीन.
स्तोत्रसंहिता 37 : 40 (IRVMR)
परमेश्वर त्यांना मदत करील आणि त्यांना तारील, तो त्यांचा वाईट लोकांपासून बचाव करतो, कारण त्यांनी परमेश्वराच्याठायी आश्रय घेतला आहे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40