स्तोत्रसंहिता 38 : 1 (IRVMR)
पश्चातापी अंतःकरणाची प्रार्थना आठवण देण्यासाठी, दाविदाचे स्तोत्र. परमेश्वरा, तुझ्या क्रोधात मला ताडना करू नकोस, आणि तुझ्या कोपात मला शिक्षा करू नकोस.
स्तोत्रसंहिता 38 : 2 (IRVMR)
कारण तुझे बाण मला छेदतात, आणि तुझा हात मला खाली दाबतो आहे.
स्तोत्रसंहिता 38 : 3 (IRVMR)
माझे सर्व शरीर तुझ्या क्रोधाने आजारी झाले आहे. आणि माझ्या अपराधांमुळे माझ्या हाडांत स्वस्थता नाही.
स्तोत्रसंहिता 38 : 4 (IRVMR)
कारण माझ्या वाईट गोष्टींनी मला दडपून टाकले आहे. ते माझ्याकरिता फार जड असे ओझे झाले आहे.
स्तोत्रसंहिता 38 : 5 (IRVMR)
माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, माझ्या जखमा संसर्गजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत.
स्तोत्रसंहिता 38 : 6 (IRVMR)
मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते; दिवसभर मी शोक करतो.
स्तोत्रसंहिता 38 : 7 (IRVMR)
कारण लज्जेने मला गाठले आहे, आणि माझे सर्व शरीर आजारी आहे.
स्तोत्रसंहिता 38 : 8 (IRVMR)
मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे. आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो.
स्तोत्रसंहिता 38 : 9 (IRVMR)
हे प्रभू, तू माझ्या हृदयाची खोल उत्कंठ इच्छा समजतोस, आणि माझे कण्हणे तुझ्यापासून लपले नाही.
स्तोत्रसंहिता 38 : 10 (IRVMR)
माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती क्षीण झाली आहे आणि माझी दृष्टीही अंधुक झाली आहे.
स्तोत्रसंहिता 38 : 11 (IRVMR)
माझ्या परिस्थितीमुळे माझे मित्र आणि माझे सोबती मला टाळतात, माझे शेजारी माझ्यापासून लांब उभे राहतात.
स्तोत्रसंहिता 38 : 12 (IRVMR)
जे माझा जीव घेऊ पाहतात ते माझ्यासाठी पाश मांडतात. जे माझी हानी करू पाहतात ते दिवसभर विध्वंसक आणि कपटाचे शब्द बोलतात.
स्तोत्रसंहिता 38 : 13 (IRVMR)
मी तर बहिर्‍यासारखा होऊन ऐकत नाही; मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही.
स्तोत्रसंहिता 38 : 14 (IRVMR)
ऐकू न येणाऱ्या माणसासारखा मी आहे, ज्याच्याकडे काही उत्तर नाही.
स्तोत्रसंहिता 38 : 15 (IRVMR)
परमेश्वरा, खचित मी तुझी वाट पाहीन. प्रभू माझ्या देवा, तू मला उत्तर देशील.
स्तोत्रसंहिता 38 : 16 (IRVMR)
कारण मी जर म्हणालो तू उत्तर दिले नाही, तर माझे शत्रू माझ्यावर आनंद करतील. जर माझा पाय घसरला, तर ते भयानक गोष्टी करतील.
स्तोत्रसंहिता 38 : 17 (IRVMR)
कारण मी अडखळून पडण्याच्या बेतास आलो आहे, आणि मी सतत यातनेत आहे.
स्तोत्रसंहिता 38 : 18 (IRVMR)
मी माझा अपराध कबूल करतो; मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे.
स्तोत्रसंहिता 38 : 19 (IRVMR)
परंतु माझे शत्रू असंख्य आहेत; जे माझा वाईटाने द्वेष करतात ते पुष्कळ आहेत.
स्तोत्रसंहिता 38 : 20 (IRVMR)
माझ्या चांगल्याची परतफेड ते वाईटाने करतात. जरी मी चांगले अनुसरलो. तरी माझ्यावर ते दोषारोपण करतात.
स्तोत्रसंहिता 38 : 21 (IRVMR)
हे परमेश्वरा, मला सोडू नकोस; माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.
स्तोत्रसंहिता 38 : 22 (IRVMR)
हे प्रभू, माझ्या तारणाऱ्या, माझे साहाय्य करण्यास त्वरा कर.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22