स्तोत्रसंहिता 42 : 1 (IRVMR)
देवप्राप्तीचा ध्यास *मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे मासकील. (शिक्षण) *जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते, तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो.
स्तोत्रसंहिता 42 : 2 (IRVMR)
माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन?
स्तोत्रसंहिता 42 : 3 (IRVMR)
जेव्हा माझे शत्रू नेहमी मला म्हणतात की, “तुझा देव कोठे आहे?” तेव्हा रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.
स्तोत्रसंहिता 42 : 4 (IRVMR)
हर्षानादाने आणि स्तुती करत, सण साजरा करणाऱ्या पुष्कळांबरोबर, कसा मी त्या गर्दीला नेतृत्व करत देवाच्या घरात घेऊन जात असे, हे आठवून माझा जीव माझ्याठायी ओतला जात आहे.
स्तोत्रसंहिता 42 : 5 (IRVMR)
हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस? माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण त्याच्या उपस्थितीने होणाऱ्या तारणामुळे मी त्याची अजून स्तुती करीन.
स्तोत्रसंहिता 42 : 6 (IRVMR)
माझ्या देवा, माझ्याठायी माझा जीव निराश झाला आहे, म्हणून यार्देनच्या प्रदेशापासून, हर्मोनच्या डोंगराच्या तीन शिखरावरून आणि मिसहारच्या टेकडीवरून मी तुझे स्मरण करतो.
स्तोत्रसंहिता 42 : 7 (IRVMR)
तुझ्या धबधब्याच्या अवाजाने ओघ ओघाला हाक मारतो. तुझ्या सर्व लहरी आणि मोठ्या लाटा माझ्यावरून गेल्या आहेत.
स्तोत्रसंहिता 42 : 8 (IRVMR)
तरी परमेश्वर त्याची प्रेमदया दिवसा अज्ञापील, आणि रात्री त्याचे गीत, म्हणजे माझ्या जीवाच्या देवाला केलेली प्रार्थना माझ्यासोबत असेल.
स्तोत्रसंहिता 42 : 9 (IRVMR)
मी देवाला म्हणेल, माझ्या खडका, तू का मला सोडले आहे? शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करू?
स्तोत्रसंहिता 42 : 10 (IRVMR)
“तुझा देव कुठे आहे?” असे बोलून माझे शत्रू तलवारीने माझ्या हाडात भोसकल्याप्रमाणे पूर्ण दिवस मला दोष देत राहतात.
स्तोत्रसंहिता 42 : 11 (IRVMR)
हे माझ्या जीवा तू का निराश झाला आहेस? माझ्यामध्ये तू तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण माझ्या मुखाचे तारण आणि माझा देव त्याची अजून मी स्तुती करीन.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11