स्तोत्रसंहिता 42 : 1 (IRVMR)
{देवप्राप्तीचा ध्यास} [PS] जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते, [QBR] तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 42 : 2 (IRVMR)
माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे. [QBR] मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन? [QBR]
स्तोत्रसंहिता 42 : 3 (IRVMR)
जेव्हा माझे शत्रू नेहमी मला म्हणतात की, “तुझा देव कोठे आहे?” [QBR] तेव्हा रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 42 : 4 (IRVMR)
हर्षानादाने आणि स्तुती करत, सण साजरा करणाऱ्या पुष्कळांबरोबर, [QBR] कसा मी त्या गर्दीला नेतृत्व करत देवाच्या घरात घेऊन जात असे, [QBR] हे आठवून माझा जीव माझ्याठायी ओतला जात आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 42 : 5 (IRVMR)
हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस? [QBR] माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? [QBR] देवाची आशा धर, कारण त्याच्या उपस्थितीने होणाऱ्या तारणामुळे [QBR] मी त्याची अजून स्तुती करीन. [QBR]
स्तोत्रसंहिता 42 : 6 (IRVMR)
माझ्या देवा, माझ्याठायी माझा जीव निराश झाला आहे, [QBR] म्हणून यार्देनच्या प्रदेशापासून, [QBR] हर्मोनच्या डोंगराच्या तीन शिखरावरून आणि मिसहारच्या टेकडीवरून मी तुझे स्मरण करतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 42 : 7 (IRVMR)
तुझ्या धबधब्याच्या अवाजाने ओघ ओघाला हाक मारतो. [QBR] तुझ्या सर्व लहरी आणि मोठ्या लाटा माझ्यावरून गेल्या आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 42 : 8 (IRVMR)
तरी परमेश्वर त्याची प्रेमदया दिवसा अज्ञापील, [QBR] आणि रात्री त्याचे गीत, म्हणजे माझ्या जीवाच्या देवाला केलेली प्रार्थना माझ्यासोबत असेल. [QBR]
स्तोत्रसंहिता 42 : 9 (IRVMR)
मी देवाला म्हणेल, माझ्या खडका, तू का मला सोडले आहे? [QBR] शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करू? [QBR]
स्तोत्रसंहिता 42 : 10 (IRVMR)
“तुझा देव कुठे आहे?” असे बोलून [QBR] माझे शत्रू तलवारीने माझ्या हाडात भोसकल्याप्रमाणे पूर्ण दिवस मला दोष देत राहतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 42 : 11 (IRVMR)
हे माझ्या जीवा तू का निराश झाला आहेस? [QBR] माझ्यामध्ये तू तळमळत आहेस? [QBR] देवाची आशा धर, कारण माझ्या मुखाचे तारण आणि [QBR] माझा देव त्याची अजून मी स्तुती करीन. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: