स्तोत्रसंहिता 44 : 1 (IRVMR)
पूर्वीच्या सुटका आणि हल्लीच्या अडचणी *मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे मसकील (शिक्षण) *हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे, की पुरातन दिवसात तू, त्यांच्या दिवसात काय कार्य केलेस.
स्तोत्रसंहिता 44 : 2 (IRVMR)
तू तुझ्या हाताने राष्ट्रांना घालवून दिलेस, परंतु आपल्या लोकांस स्थापिले, तू लोकांस पीडले परंतु आपल्या लोकांस तू वाढवले.
स्तोत्रसंहिता 44 : 3 (IRVMR)
कारण त्यांनी आपल्या तलवारीने देश मिळवला नाही. आणि त्यांच्या बाहूंनी त्यांना तारले नाही. परंतू तुझा उजवा हात, तुझा भुज, तुझ्या मुखाच्या प्रकाशाने त्यांना तारले, कारण तू त्यांच्यावर अनुकूल होतास.
स्तोत्रसंहिता 44 : 4 (IRVMR)
देवा, तू माझा राजा आहेस, याकोबाला विजय मिळावा म्हणून आज्ञा दे.
स्तोत्रसंहिता 44 : 5 (IRVMR)
तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे ढकलू. जे आमच्याविरूद्ध उठतात, तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूंना तुडवून टाकू.
स्तोत्रसंहिता 44 : 6 (IRVMR)
कारण माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही. किंवा माझी तलवार मला वाचवू शकेल.
स्तोत्रसंहिता 44 : 7 (IRVMR)
परंतु तू आम्हांला आमच्या शत्रूंपासून वाचवले आहेस. आणि जे आमचा द्वेष करतात त्यांना लाजवले आहेस.
स्तोत्रसंहिता 44 : 8 (IRVMR)
देवाच्या ठायी रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे, आणि तुझ्या नावाला आम्ही सर्वकाळ महिमा देऊ. (सेला)
स्तोत्रसंहिता 44 : 9 (IRVMR)
परंतु आता तू आम्हास फेकून दिले आहे, आणि आमची अप्रतिष्ठा होऊ दिली आहे. आणि तू आमच्या सैन्यासोबत पुढे जात नाहीस.
स्तोत्रसंहिता 44 : 10 (IRVMR)
तू आमच्या शत्रूंपुढे आम्हास मागे हटण्यास लावले, आणि आमचा द्वेष करणारे त्यांच्यासाठी लूट घेतात.
स्तोत्रसंहिता 44 : 11 (IRVMR)
तू आम्हास भक्ष्याकरता योजलेल्या मेंढ्यासारखे केले आहे, आणि आम्हास देशात विखरून टाकले आहेस.
स्तोत्रसंहिता 44 : 12 (IRVMR)
तू तुझ्या लोकांस कवडीमोलाने विकलेस, आणि असे करून तू आपली संपत्ती देखील वाढवली नाही.
स्तोत्रसंहिता 44 : 13 (IRVMR)
तू शेजाऱ्यांमध्ये आम्हांस निंदा आणि आमच्या सभोवती असणाऱ्यांमध्ये आम्हांस हसण्याजोगे आणि थट्टा असे केले आहे.
स्तोत्रसंहिता 44 : 14 (IRVMR)
राष्ट्रांमध्ये तू आम्हास अपमान असे केले आहे, लोक आम्हास बघून आपले डोके हलवतात.
स्तोत्रसंहिता 44 : 15 (IRVMR)
सर्व दिवस माझी अप्रतिष्ठा माझ्या समोर असते. आणि माझ्या मुखावरच्या लज्जेने मला झाकले आहे.
स्तोत्रसंहिता 44 : 16 (IRVMR)
कारण माझ्या निंदकाच्या आणि अपमानाच्या शब्दाने, शत्रू आणि सुड घेणाऱ्यांमुळे माझे मुख लज्जेने झाकले आहे.
स्तोत्रसंहिता 44 : 17 (IRVMR)
हे सर्व आमच्यावर आले आहे, तरी आम्ही तुला विसरलो नाही, किंवा करारांत खोटे वागलो नाही.
स्तोत्रसंहिता 44 : 18 (IRVMR)
आमचे हृदय मागे फिरले नाही, आमची पावले तुझ्यापासून दूर गेली नाहीस.
स्तोत्रसंहिता 44 : 19 (IRVMR)
तरी तू आम्हास कोल्हे राहतात त्या जागेत चिरडलेस, आणि मृत्यूछायेने आम्हास झाकले आहेस.
स्तोत्रसंहिता 44 : 20 (IRVMR)
जर आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो असेल किंवा आमचे हात अनोळखी देवाकडे पसरवले असतील,
स्तोत्रसंहिता 44 : 21 (IRVMR)
तर देव हे शोधून काढणार नाही काय? कारण तो हृदयातील गुप्त गोष्टी जाणतो.
स्तोत्रसंहिता 44 : 22 (IRVMR)
खरोखर, आम्ही दिवसभर तुझ्यासाठी मारले जात आहोत. मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.
स्तोत्रसंहिता 44 : 23 (IRVMR)
प्रभू, ऊठ तू का झोपला आहेस? ऊठ, आम्हास कायमचा सोडून जाऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 44 : 24 (IRVMR)
तू आमच्यापासून आपले मुख का लपवतोस? आणि आमचे दु:ख आणि आमच्यावरचे जुलूम तू का विसरतोस?
स्तोत्रसंहिता 44 : 25 (IRVMR)
कारण आमचा जीव धुळीस खालपर्यंत गेला आहे, आणि आमचे पोट भूमीला चिकटले आहे.
स्तोत्रसंहिता 44 : 26 (IRVMR)
आमच्या साहाय्याला ऊठ! आणि तुझ्या प्रेमदयेस्तव आम्हास वाचव.
❮
❯