स्तोत्रसंहिता 44 : 1 (IRVMR)
{पूर्वीच्या सुटका आणि हल्लीच्या अडचणी} [PS] हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे, [QBR] की पुरातन दिवसात तू, त्यांच्या दिवसात काय कार्य केलेस. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 2 (IRVMR)
तू तुझ्या हाताने राष्ट्रांना घालवून दिलेस, [QBR] परंतु आपल्या लोकांस स्थापिले, [QBR] तू लोकांस पीडले [QBR] परंतु आपल्या लोकांस तू वाढवले. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 3 (IRVMR)
कारण त्यांनी आपल्या तलवारीने देश मिळवला नाही. [QBR] आणि त्यांच्या बाहूंनी त्यांना तारले नाही. [QBR] परंतू तुझा उजवा हात, तुझा भुज, तुझ्या मुखाच्या प्रकाशाने त्यांना तारले, [QBR] कारण तू त्यांच्यावर अनुकूल होतास. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 4 (IRVMR)
देवा, तू माझा राजा आहेस, [QBR] याकोबाला विजय मिळावा म्हणून आज्ञा दे. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 5 (IRVMR)
तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे ढकलू. [QBR] जे आमच्याविरूद्ध उठतात, तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूंना तुडवून टाकू. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 6 (IRVMR)
कारण माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही. [QBR] किंवा माझी तलवार मला वाचवू शकेल. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 7 (IRVMR)
परंतु तू आम्हांला आमच्या शत्रूंपासून वाचवले आहेस. [QBR] आणि जे आमचा द्वेष करतात त्यांना लाजवले आहेस. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 8 (IRVMR)
देवाच्या ठायी रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे, [QBR] आणि तुझ्या नावाला आम्ही सर्वकाळ महिमा देऊ. (सेला) [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 9 (IRVMR)
परंतु आता तू आम्हास फेकून दिले आहे, [QBR] आणि आमची अप्रतिष्ठा होऊ दिली आहे. [QBR] आणि तू आमच्या सैन्यासोबत पुढे जात नाहीस. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 10 (IRVMR)
तू आमच्या शत्रूंपुढे आम्हास मागे हटण्यास लावले, [QBR] आणि आमचा द्वेष करणारे त्यांच्यासाठी लूट घेतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 11 (IRVMR)
तू आम्हास भक्ष्याकरता योजलेल्या मेंढ्यासारखे केले आहे, [QBR] आणि आम्हास देशात विखरून टाकले आहेस. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 12 (IRVMR)
तू तुझ्या लोकांस कवडीमोलाने विकलेस, [QBR] आणि असे करून तू आपली संपत्ती देखील वाढवली नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 13 (IRVMR)
तू शेजाऱ्यांमध्ये आम्हांस निंदा आणि [QBR] आमच्या सभोवती असणाऱ्यांमध्ये आम्हांस हसण्याजोगे आणि थट्टा असे केले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 14 (IRVMR)
राष्ट्रांमध्ये तू आम्हास अपमान असे केले आहे, [QBR] लोक आम्हास बघून आपले डोके हलवतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 15 (IRVMR)
सर्व दिवस माझी अप्रतिष्ठा माझ्या समोर असते. [QBR] आणि माझ्या मुखावरच्या लज्जेने मला झाकले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 16 (IRVMR)
कारण माझ्या निंदकाच्या आणि अपमानाच्या शब्दाने, [QBR] शत्रू आणि सुड घेणाऱ्यांमुळे माझे मुख लज्जेने झाकले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 17 (IRVMR)
हे सर्व आमच्यावर आले आहे, तरी आम्ही तुला विसरलो नाही, [QBR] किंवा करारांत खोटे वागलो नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 18 (IRVMR)
आमचे हृदय मागे फिरले नाही, [QBR] आमची पावले तुझ्यापासून दूर गेली नाहीस. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 19 (IRVMR)
तरी तू आम्हास कोल्हे राहतात त्या जागेत चिरडलेस, [QBR] आणि मृत्यूछायेने आम्हास झाकले आहेस. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 20 (IRVMR)
जर आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो असेल [QBR] किंवा आमचे हात अनोळखी देवाकडे पसरवले असतील, [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 21 (IRVMR)
तर देव हे शोधून काढणार नाही काय? [QBR] कारण तो हृदयातील गुप्त गोष्टी जाणतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 22 (IRVMR)
खरोखर, आम्ही दिवसभर तुझ्यासाठी मारले जात आहोत. [QBR] मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 23 (IRVMR)
प्रभू, ऊठ तू का झोपला आहेस? [QBR] ऊठ, आम्हास कायमचा सोडून जाऊ नकोस. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 24 (IRVMR)
तू आमच्यापासून आपले मुख का लपवतोस? [QBR] आणि आमचे दु:ख आणि आमच्यावरचे जुलूम तू का विसरतोस? [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 25 (IRVMR)
कारण आमचा जीव धुळीस खालपर्यंत गेला आहे, [QBR] आणि आमचे पोट भूमीला चिकटले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 44 : 26 (IRVMR)
आमच्या साहाय्याला ऊठ! [QBR] आणि तुझ्या प्रेमदयेस्तव आम्हास वाचव. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: