स्तोत्रसंहिता 47 : 1 (IRVMR)
देव अखिल पृथ्वीचा राजा कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीते अहो सर्व लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. विजयोत्सवाने देवाचा जयजयकार करा.
स्तोत्रसंहिता 47 : 2 (IRVMR)
कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे; तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे.
स्तोत्रसंहिता 47 : 3 (IRVMR)
तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो.
स्तोत्रसंहिता 47 : 4 (IRVMR)
त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे.
स्तोत्रसंहिता 47 : 5 (IRVMR)
जयघोष होत असता देव वर गेला, परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला.
स्तोत्रसंहिता 47 : 6 (IRVMR)
देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा; आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा.
स्तोत्रसंहिता 47 : 7 (IRVMR)
कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा.
स्तोत्रसंहिता 47 : 8 (IRVMR)
देव राष्ट्रांवर राज्य करतो; देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.
स्तोत्रसंहिता 47 : 9 (IRVMR)
अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तो अत्यंत उंच आहे.
❮
❯