स्तोत्रसंहिता 48 : 1 (IRVMR)
{सीयोनेचे सौंदर्य व वैभव} [PS] आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, [QBR] परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 48 : 2 (IRVMR)
सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे, [QBR] त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते. [QBR]
स्तोत्रसंहिता 48 : 3 (IRVMR)
देवाने तिच्या राजमहालांमध्ये आपणास आश्रयदुर्ग असे प्रगट केले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 48 : 4 (IRVMR)
कारण, पाहा, राजे एकत्र येत आहेत, [QBR] ते एकत्र येऊन चढाई करून आले. [QBR]
स्तोत्रसंहिता 48 : 5 (IRVMR)
त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. [QBR] ते निराश झाले आणि पळत सुटले. [QBR]
स्तोत्रसंहिता 48 : 6 (IRVMR)
भयाने त्यांना गाठले, भीतीने त्यांचा थरकाप झाला. [QBR] प्रसवणाऱ्या स्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांना वेदना लागल्या. [QBR]
स्तोत्रसंहिता 48 : 7 (IRVMR)
पूर्वेकडच्या वाऱ्याने [QBR] तू तार्शीशाची जहाजे मोडलीस. [QBR]
स्तोत्रसंहिता 48 : 8 (IRVMR)
होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नगरात, [QBR] आमच्या देवाच्या नगरात घडत असलेले पाहिले. [QBR] देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 48 : 9 (IRVMR)
देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमदयेचा विचार करतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 48 : 10 (IRVMR)
देवा, जसे तुझे नाव आहे, [QBR] तशी तुझी किर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 48 : 11 (IRVMR)
तुझ्या न्याय कृत्यांमुळे, सियोन पर्वत आनंद करो, [QBR] यहूदाची कन्या हर्ष करोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 48 : 12 (IRVMR)
सियोने भोवती फिरा, शहर बघा, तिचे बुरुज मोजा. [QBR]
स्तोत्रसंहिता 48 : 13 (IRVMR)
उंच भिंती बघा, सियोनेच्या राजवाड्याचे वर्णन करा. [QBR] नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल. [QBR]
स्तोत्रसंहिता 48 : 14 (IRVMR)
कारण हा देव, आमचा देव, सदासर्वकाळ आहे. [QBR] तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल. [PE]
❮
❯