स्तोत्रसंहिता 48 : 1 (IRVMR)
सीयोनेचे सौंदर्य व वैभव कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीत. आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे.
स्तोत्रसंहिता 48 : 2 (IRVMR)
सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे, त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते.
स्तोत्रसंहिता 48 : 3 (IRVMR)
देवाने तिच्या राजमहालांमध्ये आपणास आश्रयदुर्ग असे प्रगट केले आहे.
स्तोत्रसंहिता 48 : 4 (IRVMR)
कारण, पाहा, राजे एकत्र येत आहेत, ते एकत्र येऊन चढाई करून आले.
स्तोत्रसंहिता 48 : 5 (IRVMR)
त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. ते निराश झाले आणि पळत सुटले.
स्तोत्रसंहिता 48 : 6 (IRVMR)
भयाने त्यांना गाठले, भीतीने त्यांचा थरकाप झाला. प्रसवणाऱ्या स्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांना वेदना लागल्या.
स्तोत्रसंहिता 48 : 7 (IRVMR)
पूर्वेकडच्या वाऱ्याने तू तार्शीशाची जहाजे मोडलीस.
स्तोत्रसंहिता 48 : 8 (IRVMR)
होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात घडत असलेले पाहिले. देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
स्तोत्रसंहिता 48 : 9 (IRVMR)
देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमदयेचा विचार करतो.
स्तोत्रसंहिता 48 : 10 (IRVMR)
देवा, जसे तुझे नाव आहे, तशी तुझी किर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत आहे.
स्तोत्रसंहिता 48 : 11 (IRVMR)
तुझ्या न्याय कृत्यांमुळे, सियोन पर्वत आनंद करो, यहूदाची कन्या हर्ष करोत.
स्तोत्रसंहिता 48 : 12 (IRVMR)
सियोने भोवती फिरा, शहर बघा, तिचे बुरुज मोजा.
स्तोत्रसंहिता 48 : 13 (IRVMR)
उंच भिंती बघा, सियोनेच्या राजवाड्याचे वर्णन करा. नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
स्तोत्रसंहिता 48 : 14 (IRVMR)
कारण हा देव, आमचा देव, सदासर्वकाळ आहे. तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14