स्तोत्रसंहिता 49 : 1 (IRVMR)
संपत्तीवर भरवसा ठेवण्याचा वेडेपणा मुख्य गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तोत्र. सर्व लोकांनो, हे ऐका. जगाचे सर्व रहिवासी, तुम्ही हे ऐका.
स्तोत्रसंहिता 49 : 2 (IRVMR)
गरीब आणि श्रीमंत दोघेही, उच्च आणि नीच.
स्तोत्रसंहिता 49 : 3 (IRVMR)
माझे मुख ज्ञान बोलेल, आणि माझ्या हृदयातील विचार समंजसपणाचे असणार.
स्तोत्रसंहिता 49 : 4 (IRVMR)
मी दृष्टांताकडे आपले कान लावीन, मी आपली गोष्ट वीणे सोबत सुरु करणार.
स्तोत्रसंहिता 49 : 5 (IRVMR)
संकटाच्या दिवसात, जेव्हा अन्याय माझ्या पायाला वेढा घालतो, तेव्हा मी कशाला घाबरू?
स्तोत्रसंहिता 49 : 6 (IRVMR)
जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, आणि आपल्या धनाच्या विपुलतेविषयी बढाई मारतात,
स्तोत्रसंहिता 49 : 7 (IRVMR)
त्यातील कोणीही आपल्या भावाला खंडून घेण्यास समर्थ नाही, किंवा त्याच्यासाठी देवाकडे खंडणी देववत नाही.
स्तोत्रसंहिता 49 : 8 (IRVMR)
कारण त्यांच्या जीवाची खंडणी महाग आहे, आणि तिची भरपाई करणे कधीच शक्य नाही.
स्तोत्रसंहिता 49 : 9 (IRVMR)
यासाठी की त्यांना सर्वकाळ जगावे, म्हणजे त्यांचे शरीर कुजणार नाही.
स्तोत्रसंहिता 49 : 10 (IRVMR)
कारण सर्वजण बघतात की बुद्धीमान मरतो, मूर्ख आणि मतिमंद नष्ट होतो. आणि आपली संपत्ती इतरांसाठी सोडून जातात.
स्तोत्रसंहिता 49 : 11 (IRVMR)
त्यांच्या मनातील विचार हे असतात की, त्यांचे कुटूंब सर्वकाळ राहणार, आणि ज्या ठिकाणी ते राहतात ते पिढ्यानपिढ्या राहणार, ते आपल्या भूमीस आपले नाव देतात.
स्तोत्रसंहिता 49 : 12 (IRVMR)
परंतु संपत्ती असणारा मनुष्य सर्वकाळ राहत नाही, तो पशूसारखाच नाश होणारा आहे.
स्तोत्रसंहिता 49 : 13 (IRVMR)
हा त्यांचा मार्ग मुर्खपण आहे, तरी त्यांच्या मागे येणारे त्याचे असे म्हणजे मंजूर करतो.
स्तोत्रसंहिता 49 : 14 (IRVMR)
ते कळपाप्रमाणे नेमलेले आहेत, जे मृतलोकांत जातात. मरण त्यांचा मेंढपाळ आहे. सरळ त्यांच्यावर धनीपण करतील असे सामर्थ्य त्यांना असेल.
स्तोत्रसंहिता 49 : 15 (IRVMR)
परंतु देव मृतलोकांच्या सामर्थ्यापासून माझा जीव खंडून घेणार. तो मला जवळ करणार.
स्तोत्रसंहिता 49 : 16 (IRVMR)
जेव्हा कोणी श्रीमंत होतो आणि त्याच्या घराचे सामर्थ्य वाढते, तर तू भयभीत होऊ नको.
स्तोत्रसंहिता 49 : 17 (IRVMR)
कारण तो मरेल तेव्हा काहीच सोबत घेऊन जाणार नाही. त्याचे सामर्थ्य त्याच्या मागे खाली उतरणार नाही.
स्तोत्रसंहिता 49 : 18 (IRVMR)
जरी तो आपल्या जीवनात आपल्या जीवाला आशीर्वाद देत असेल, आणि तू आपल्यासाठी जगला असता मनुष्यांनी तुझी स्तुती केली.
स्तोत्रसंहिता 49 : 19 (IRVMR)
तरी तो आपल्या वडिलांच्या पिढीकडे जाणार, ते कधीच प्रकाश पाहणार नाहीत.
स्तोत्रसंहिता 49 : 20 (IRVMR)
ज्याकडे संपत्ती आहे, परंतु त्यास काही समजत नाही, तर तो नाश होणाऱ्या पशूसारखा आहे.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20