स्तोत्रसंहिता 5 : 1 (IRVMR)
{संरक्षणासाठी प्रार्थना} [PS] हे परमेश्वरा, माझे बोलणे ऐक. [QBR] माझे कण्हणे विचारात घे. [QBR]
स्तोत्रसंहिता 5 : 2 (IRVMR)
माझ्या देवा! माझ्या राजा! माझ्या रडण्याच्या शब्दाकडे कान दे, कारण मी तुझी प्रार्थना करीत आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 5 : 3 (IRVMR)
परमेश्वरा, सकाळी तू माझे रडणे ऐकशील, [QBR] सकाळी मी माझी विनंती [* अर्पणे] तुझ्याकडे व्यवस्थीत रीतीने मांडीन व अपेक्षेने वाट पाहीन. [QBR]
स्तोत्रसंहिता 5 : 4 (IRVMR)
खचित तू असा देव आहेस, जो वाईटाला संमती देत नाही. [QBR] दुर्जन लोकांचे तू स्वागत करीत नाहीस. [QBR]
स्तोत्रसंहिता 5 : 5 (IRVMR)
गर्विष्ठ तुझ्या उपस्थीतीत उभे राहणार नाहीत, दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा तू द्वेष करतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 5 : 6 (IRVMR)
खोट बोलणाऱ्याचा तू सर्वनाश करतोस; [QBR] परमेश्वर हिंसक आणि कपटी मनुष्याचा तिरस्कार करतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 5 : 7 (IRVMR)
पण मी तर तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने तुझ्या घरांत प्रवेश करीन, [QBR] मी पवित्र मंदिरात तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नमन करीन. [QBR]
स्तोत्रसंहिता 5 : 8 (IRVMR)
हे प्रभू, माझ्या शत्रूंमुळे तू आपल्या न्यायीपणात मला चालव, [QBR] तुझे मार्ग माझ्या समोर सरळ कर. [QBR]
स्तोत्रसंहिता 5 : 9 (IRVMR)
कारण त्यांच्या मुखात काही सत्य नाही, [QBR] त्यांचे अंतर्याम दुष्टपणच आहे. [QBR] त्यांचा गळा उघडे थडगे आहे, [QBR] ते आपल्या जीभेने आर्जव करतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 5 : 10 (IRVMR)
देवा, त्यांना अपराधी घोषीत कर, [QBR] त्यांच्याच योजना त्यांना पडण्यास कारणीभूत ठरो. [QBR] तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्ह्यांबद्दल घालवून दे. [QBR] कारण त्यांनी तुझ्याविरूद्ध बंड केले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 5 : 11 (IRVMR)
परंतु जे सर्व तुझ्यामध्ये आश्रय घेतात ते हर्ष करोत. [QBR] ते कायमचे हर्षोनाद करो, कारण तू त्यांचे रक्षण करतोस. [QBR] ज्यांना तुझे नाव प्रिय आहे, ते तुझ्यामध्ये आनंद करोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 5 : 12 (IRVMR)
कारण तुच धार्मिकाला आशीर्वाद देतोस, हे परमेश्वरा, तू तुझ्या कृपेच्या ढालीने यांना वाढवतोस. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: