स्तोत्रसंहिता 50 : 1 (IRVMR)
देव न्यायाधीश आहे आसाफाचे स्तोत्र. थोर परमेश्वर देव, बोलला आहे. आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली.
स्तोत्रसंहिता 50 : 2 (IRVMR)
सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून देव प्रकाशला आहे.
स्तोत्रसंहिता 50 : 3 (IRVMR)
आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही, त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे, आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
स्तोत्रसंहिता 50 : 4 (IRVMR)
त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली, म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील.
स्तोत्रसंहिता 50 : 5 (IRVMR)
देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. ज्यांनी यज्ञाच्या व्दारे माझ्याशी करार केला आहे.”
स्तोत्रसंहिता 50 : 6 (IRVMR)
आकाश त्याच्या चांगुलपणाविषयी सांगत असते. कारण देव स्वतः न्यायधीश आहे.
स्तोत्रसंहिता 50 : 7 (IRVMR)
हे माझ्या लोकांनो, ऐका, आणि मी बोलेन, मी देव आहे, तुमचा देव आहे.
स्तोत्रसंहिता 50 : 8 (IRVMR)
मी तुमच्या होमार्पणाबद्दल तक्रार करीत नाही. तुमची होमार्पणे निरंतर माझ्यापुढे आहेत,
स्तोत्रसंहिता 50 : 9 (IRVMR)
मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही. किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही.
स्तोत्रसंहिता 50 : 10 (IRVMR)
कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे, हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.
स्तोत्रसंहिता 50 : 11 (IRVMR)
उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत.
स्तोत्रसंहिता 50 : 12 (IRVMR)
मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही, कारण जग माझेच आहे, आणि त्यातील सर्वकाही माझेच आहे.
स्तोत्रसंहिता 50 : 13 (IRVMR)
मी बैलाचे मांस खाणार का? मी बकऱ्यांचे रक्त पिणार का?
स्तोत्रसंहिता 50 : 14 (IRVMR)
देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर, आणि परत्पराकडे आपले नवस फेड.
स्तोत्रसंहिता 50 : 15 (IRVMR)
तू संकटात असता मला हाक मार, आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील.
स्तोत्रसंहिता 50 : 16 (IRVMR)
देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे? आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस?
स्तोत्रसंहिता 50 : 17 (IRVMR)
कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस, आणि माझी वचने झुगारून देतोस?
स्तोत्रसंहिता 50 : 18 (IRVMR)
तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता.
स्तोत्रसंहिता 50 : 19 (IRVMR)
तू वाईटाला आपले मुख देतोस, आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते.
स्तोत्रसंहिता 50 : 20 (IRVMR)
तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलता. तू आपल्या सख्या भावाची निंदा करतोस.
स्तोत्रसंहिता 50 : 21 (IRVMR)
तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प राहिलो. मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले, परंतू मी तुझा निषेध करणार आणि तुझ्या डोळ्यापुढे ओळीने सर्वकाही मांडणार.
स्तोत्रसंहिता 50 : 22 (IRVMR)
तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हास फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही.
स्तोत्रसंहिता 50 : 23 (IRVMR)
जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो, आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो, त्यास मी देवाचे तारण दाखवेन.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23