स्तोत्रसंहिता 52 : 1 (IRVMR)
{ज्ञानशून्य दुष्ट} [PS] हे सामर्थ्यवान पुरुषा, तू वाईट गोष्टींचा अभिमान का बाळगतोस? [QBR] देवाच्या कराराची विश्वसनियता प्रत्येक दिवशी येते. [QBR]
स्तोत्रसंहिता 52 : 2 (IRVMR)
अरे कपटाने कार्य करणाऱ्या, [QBR] तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी नाशाची योजना करते. [QBR]
स्तोत्रसंहिता 52 : 3 (IRVMR)
तुला चांगल्यापेक्षा वाईटाची, [QBR] आणि प्रामाणिकपणे बोलण्यापेक्षा असत्याची अधिक आवड आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 52 : 4 (IRVMR)
तू कपटी जीभे, [QBR] तुला दुसऱ्यांचा नाश करणारे शब्द आवडतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 52 : 5 (IRVMR)
त्याप्रमाणे देव तुझा सर्वकाळ नाश करील; [QBR] तो तुला वर घेऊन जाईल आणि आपल्या तंबूतून उपटून बाहेर काढेल [QBR] आणि तुला जिवंताच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील. [QBR]
स्तोत्रसंहिता 52 : 6 (IRVMR)
नितीमानसुद्धा ते पाहतील आणि घाबरतील; [QBR] ते त्याच्याकडे पाहून हसतील आणि म्हणतील, [QBR]
स्तोत्रसंहिता 52 : 7 (IRVMR)
पाहा, या मनुष्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, [QBR] पण आपल्या विपुल संपत्तीवर भरवसा ठेवला, [QBR] आणि आपल्या दुष्टपणात स्वतःला पक्के केले. [QBR]
स्तोत्रसंहिता 52 : 8 (IRVMR)
पण मी तर देवाच्या घरात हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; [QBR] माझा देवाच्या कराराच्या विश्वसनीयतेवर सदासर्वकाळ आणि कायम भरवसा आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 52 : 9 (IRVMR)
कारण ज्या गोष्टी तू केल्या आहेत, त्यासाठी मी तुझ्या [QBR] विश्वासणाऱ्यांच्या समक्षेत सर्वकाळ तुझे उपकार मानीन. [QBR] आणि तुझ्या नावात आशा ठेवली आहे कारण ते चांगले आहे. [PE]
❮
❯