स्तोत्रसंहिता 54 : 1 (IRVMR)
शत्रूंपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव, आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर.
स्तोत्रसंहिता 54 : 2 (IRVMR)
हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या शब्दाकडे कान दे.
स्तोत्रसंहिता 54 : 3 (IRVMR)
कारण माझ्याविरूद्ध परके * गर्विष्ठ उठले आहेत, आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत; त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही.
स्तोत्रसंहिता 54 : 4 (IRVMR)
पाहा, देव माझा मदतनीस आहे; प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे.
स्तोत्रसंहिता 54 : 5 (IRVMR)
तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील; तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर.
स्तोत्रसंहिता 54 : 6 (IRVMR)
मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण; हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे.
स्तोत्रसंहिता 54 : 7 (IRVMR)
कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे; माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.
❮
❯