स्तोत्रसंहिता 55 : 1 (IRVMR)
{विश्वासघातक्यांचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना} [PS] हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान लाव, [QBR] आणि माझ्या विणवनीपासून लपू नकोस. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 2 (IRVMR)
देवा, माझ्याकडे लक्ष लाव आणि मला उत्तर दे [QBR] माझ्या संकटात मला विसावा नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 3 (IRVMR)
माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे, [QBR] दुष्टाच्या जुलूमामुळे मी कण्हत आहे, [QBR] कारण ते माझ्यावर संकट आणतात, [QBR] आणि द्वेषात माझा पाठलाग करतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 4 (IRVMR)
माझे हृदय फार दुखणाईत आहे, [QBR] आणि मृत्यूचे भय माझ्यावर येऊन पडले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 5 (IRVMR)
भय आणि थरथरने माझ्यावर आली आहेत, [QBR] आणि भयाने मला ग्रासले आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 6 (IRVMR)
मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. [QBR] मी दूर उडून गेलो असतो आणि स्वस्थ राहिलो असतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 7 (IRVMR)
मी खूप दूर भटकत गेलो असतो. [QBR] मी रानात राहिलो असतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 8 (IRVMR)
वादळी वाऱ्यापासून मला आश्रय मिळावा म्हणून मी लवकर पळालो असतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 9 (IRVMR)
प्रभू, त्यांना नाश कर, आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर. [QBR] कारण मी शहरात हिंसा आणि भांडणे पाहिली आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 10 (IRVMR)
दिवस रात्र ते भींतीवर चढून जातात; [QBR] अपराध आणि अनर्थ तिच्यामध्ये आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 11 (IRVMR)
दुष्टपणा तिच्यामध्ये कार्य करत आहे, [QBR] जुलूम आणि कपट कधीही तिच्या रस्त्यांना सोडत नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 12 (IRVMR)
कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर [QBR] तर मला कळून आले असते, [QBR] किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता, [QBR] तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 13 (IRVMR)
परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस, [QBR] माझा मित्र, माझा साथीदार, माझा दोस्त. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 14 (IRVMR)
एकमेकांसोबत आपली गोड सहभागिता होती. [QBR] आपण समुदायांबरोबर चालत देवाच्या घरात जात होतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 15 (IRVMR)
मृत्यू त्यांच्यावर अकस्मात येवो. [QBR] जीवंतपणी ते मृतलोकांत खाली जावोत. [QBR] कारण त्यांच्या जगण्यात दुष्टपण आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 16 (IRVMR)
मी तर देवाला हाक मारीन, [QBR] आणि परमेश्वर मला तारील. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 17 (IRVMR)
मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपले गाऱ्हाणे करेन आणि कण्हेन. [QBR] आणि तो माझी वाणी ऐकेल. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 18 (IRVMR)
माझ्याविरूद्ध लढाणाऱ्यांपासून त्याने मला खंडूण, माझा जीव शांततेत ठेवला आहे. [QBR] कारण माझ्याविरूद्ध लढणारे पुष्कळ होते. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 19 (IRVMR)
देव, जो पुरातन काळापासून आहे, [QBR] तो ऐकणार आणि त्यांना प्रतिसाद देणार, (सेला) [QBR] ते मनुष्ये बदलत नाहीत; [QBR] ती देवाला भीत नाहीत. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 20 (IRVMR)
माझ्या मित्रांनी त्याच्या सोबत शांतीने राहणाऱ्यांवर आपला हात उगारला आहे. [QBR] त्याने आपला करार मोडला आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 21 (IRVMR)
त्यांचे तोंड लोण्यासारखे आहे, [QBR] परंतू त्याचे हृदय शत्रुत्व करणारेच आहे. [QBR] त्यांचे शब्द तेलापेक्षा बुळ्बुळीतआहेत, [QBR] तरी ते बाहेर काढलेल्या तलवारी सारखे आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 22 (IRVMR)
तू आपला भार परमेश्वरावर टाक, [QBR] म्हणजे तो तुला आधार देईल. [QBR] तो नितीमानाला कधी पडू देणार नाही. [QBR]
स्तोत्रसंहिता 55 : 23 (IRVMR)
परंतू हे देवा, तू त्यांना नाशाच्या खांचेत पाडून टाकशील; [QBR] घातकी आणि कपटी मनुष्ये आपले अर्धे आयुष्यही जगणार नाहीत, [QBR] परंतू मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. [PE]
❮
❯