स्तोत्रसंहिता 55 : 1 (IRVMR)
विश्वासघातक्यांचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना *मुख्य गायकासाठी; तंतूवाद्दावरचे दाविदाचे स्तोत्र. *हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान लाव, आणि माझ्या विणवनीपासून लपू नकोस.
स्तोत्रसंहिता 55 : 2 (IRVMR)
देवा, माझ्याकडे लक्ष लाव आणि मला उत्तर दे माझ्या संकटात मला विसावा नाही.
स्तोत्रसंहिता 55 : 3 (IRVMR)
माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे, दुष्टाच्या जुलूमामुळे मी कण्हत आहे, कारण ते माझ्यावर संकट आणतात, आणि द्वेषात माझा पाठलाग करतात.
स्तोत्रसंहिता 55 : 4 (IRVMR)
माझे हृदय फार दुखणाईत आहे, आणि मृत्यूचे भय माझ्यावर येऊन पडले आहे.
स्तोत्रसंहिता 55 : 5 (IRVMR)
भय आणि थरथरने माझ्यावर आली आहेत, आणि भयाने मला ग्रासले आहे.
स्तोत्रसंहिता 55 : 6 (IRVMR)
मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. मी दूर उडून गेलो असतो आणि स्वस्थ राहिलो असतो.
स्तोत्रसंहिता 55 : 7 (IRVMR)
मी खूप दूर भटकत गेलो असतो. मी रानात राहिलो असतो.
स्तोत्रसंहिता 55 : 8 (IRVMR)
वादळी वाऱ्यापासून मला आश्रय मिळावा म्हणून मी लवकर पळालो असतो.
स्तोत्रसंहिता 55 : 9 (IRVMR)
प्रभू, त्यांना नाश कर, आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर. कारण मी शहरात हिंसा आणि भांडणे पाहिली आहेत.
स्तोत्रसंहिता 55 : 10 (IRVMR)
दिवस रात्र ते भींतीवर चढून जातात; अपराध आणि अनर्थ तिच्यामध्ये आहेत.
स्तोत्रसंहिता 55 : 11 (IRVMR)
दुष्टपणा तिच्यामध्ये कार्य करत आहे, जुलूम आणि कपट कधीही तिच्या रस्त्यांना सोडत नाही.
स्तोत्रसंहिता 55 : 12 (IRVMR)
कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर तर मला कळून आले असते, किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता, तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते.
स्तोत्रसंहिता 55 : 13 (IRVMR)
परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस, माझा मित्र, माझा साथीदार, माझा दोस्त.
स्तोत्रसंहिता 55 : 14 (IRVMR)
एकमेकांसोबत आपली गोड सहभागिता होती. आपण समुदायांबरोबर चालत देवाच्या घरात जात होतो.
स्तोत्रसंहिता 55 : 15 (IRVMR)
मृत्यू त्यांच्यावर अकस्मात येवो. जीवंतपणी ते मृतलोकांत खाली जावोत. कारण त्यांच्या जगण्यात दुष्टपण आहे.
स्तोत्रसंहिता 55 : 16 (IRVMR)
मी तर देवाला हाक मारीन, आणि परमेश्वर मला तारील.
स्तोत्रसंहिता 55 : 17 (IRVMR)
मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपले गाऱ्हाणे करेन आणि कण्हेन. आणि तो माझी वाणी ऐकेल.
स्तोत्रसंहिता 55 : 18 (IRVMR)
माझ्याविरूद्ध लढाणाऱ्यांपासून त्याने मला खंडूण, माझा जीव शांततेत ठेवला आहे. कारण माझ्याविरूद्ध लढणारे पुष्कळ होते.
स्तोत्रसंहिता 55 : 19 (IRVMR)
देव, जो पुरातन काळापासून आहे, तो ऐकणार आणि त्यांना प्रतिसाद देणार, (सेला) ते मनुष्ये बदलत नाहीत; ती देवाला भीत नाहीत.
स्तोत्रसंहिता 55 : 20 (IRVMR)
माझ्या मित्रांनी त्याच्या सोबत शांतीने राहणाऱ्यांवर आपला हात उगारला आहे. त्याने आपला करार मोडला आहे.
स्तोत्रसंहिता 55 : 21 (IRVMR)
त्यांचे तोंड लोण्यासारखे आहे, परंतू त्याचे हृदय शत्रुत्व करणारेच आहे. त्यांचे शब्द तेलापेक्षा बुळ्बुळीतआहेत, तरी ते बाहेर काढलेल्या तलवारी सारखे आहे.
स्तोत्रसंहिता 55 : 22 (IRVMR)
तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुला आधार देईल. तो नितीमानाला कधी पडू देणार नाही.
स्तोत्रसंहिता 55 : 23 (IRVMR)
परंतू हे देवा, तू त्यांना नाशाच्या खांचेत पाडून टाकशील; घातकी आणि कपटी मनुष्ये आपले अर्धे आयुष्यही जगणार नाहीत, परंतू मी तुझ्यावर विश्वास ठेवीन.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23