स्तोत्रसंहिता 57 : 1 (IRVMR)
छळणाऱ्यांच्या हातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना
स्तोत्र. 108:1-5
दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत तुझ्यात आश्रय घेतो.
स्तोत्रसंहिता 57 : 2 (IRVMR)
मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्वकाही करतो त्याचा मी धावा करीन.
स्तोत्रसंहिता 57 : 3 (IRVMR)
तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो, जेव्हा मनुष्य मला गिळून टाकण्याची इच्छा करतो तेव्हा तो त्यास धमकावतो; देव त्याच्या कराराची विश्वसनीयता आणि त्याचा विश्वासूपणा मला दाखवतो.
स्तोत्रसंहिता 57 : 4 (IRVMR)
माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने रहावे लागत आहे.
स्तोत्रसंहिता 57 : 5 (IRVMR)
हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो; तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर होवो.
स्तोत्रसंहिता 57 : 6 (IRVMR)
त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे; माझा जीव वाकून गेला आहे; त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे, परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत.
स्तोत्रसंहिता 57 : 7 (IRVMR)
हे देवा, माझे हृदय स्थिर आहे, माझे हृदय स्थिर आहे; मी गाईन, होय, मी स्तुती गाईन.
स्तोत्रसंहिता 57 : 8 (IRVMR)
हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो; हे सतारी आणि वीणे, जागे व्हा; मी पहाटेला जागे करीन.
स्तोत्रसंहिता 57 : 9 (IRVMR)
हे प्रभू, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन; मी सर्व राष्ट्रांमध्ये तुझी स्तवने गाईन.
स्तोत्रसंहिता 57 : 10 (IRVMR)
कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे आणि तुझा विश्वासूपणा ढगापर्यंत पोहचतो.
स्तोत्रसंहिता 57 : 11 (IRVMR)
हे देवा, तू आकाशाच्या वर उंचविला जावो; तुझा महिमा सर्व पृथ्वीवर उंच होवो.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11