स्तोत्रसंहिता 60 : 1 (IRVMR)
{शत्रूला विरोध करण्यासाठी साहाय्याची याचना} [PS] हे देवा, तू आम्हास टाकून दिले आहेस; तू आम्हास फाडून खाली टाकले आहे; आमच्यावर रागावला आहेस; [QBR] तू आम्हांस पुन्हा पूर्वस्थितीवर आण. [QBR]
स्तोत्रसंहिता 60 : 2 (IRVMR)
तू भूमी कंपित केली आहेस; तू ती फाडून वेगळी केली; तिचे खिंडार बरे कर, [QBR] कारण ती हादरत आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 60 : 3 (IRVMR)
तू तुझ्या लोकांस कठीण गोष्टी दाखवल्या आहेत; [QBR] तू आम्हास झिंगवण्यास लावणारा द्राक्षरस पाजला आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 60 : 4 (IRVMR)
तुझा आदर करणाऱ्यास तू निशाण दिले आहे, [QBR] यासाठी की, त्यांनी सत्याकरता तो उभारावा. [QBR]
स्तोत्रसंहिता 60 : 5 (IRVMR)
ज्यांच्यावर तू प्रेम करतो त्यांची सुटका व्हावी, [QBR] म्हणून तुझ्या उजव्या हाताने आमची सुटका कर आणि आम्हास उत्तर दे. [QBR]
स्तोत्रसंहिता 60 : 6 (IRVMR)
देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी जल्लोष करीन; [QBR] मी शखेमाची वाटणी करीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन. [QBR]
स्तोत्रसंहिता 60 : 7 (IRVMR)
गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे; [QBR] एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे; [QBR] यहूदा माझा राजदंड आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 60 : 8 (IRVMR)
मवाब माझे धुण्याचे पात्र आहे; [QBR] अदोमावर मी माझे पादत्राण फेकीन; [QBR] मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन. [QBR]
स्तोत्रसंहिता 60 : 9 (IRVMR)
मला बळकट नगरात कोण नेईल? [QBR] मला अदोमात कोण नेईल? [QBR]
स्तोत्रसंहिता 60 : 10 (IRVMR)
हे देवा, तू आम्हास नाकारले नाही? [QBR] परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस. [QBR]
स्तोत्रसंहिता 60 : 11 (IRVMR)
तू आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत कर, [QBR] कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 60 : 12 (IRVMR)
आम्ही देवाच्या मदतीने विजयी होऊ; [QBR] तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडविल. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: