स्तोत्रसंहिता 60 : 1 (IRVMR)
शत्रूला विरोध करण्यासाठी साहाय्याची याचना
स्तोत्र. 108:6-13
दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू आम्हास टाकून दिले आहेस; तू आम्हास फाडून खाली टाकले आहे; आमच्यावर रागावला आहेस; तू आम्हांस पुन्हा पूर्वस्थितीवर आण.
स्तोत्रसंहिता 60 : 2 (IRVMR)
तू भूमी कंपित केली आहेस; तू ती फाडून वेगळी केली; तिचे खिंडार बरे कर, कारण ती हादरत आहे.
स्तोत्रसंहिता 60 : 3 (IRVMR)
तू तुझ्या लोकांस कठीण गोष्टी दाखवल्या आहेत; तू आम्हास झिंगवण्यास लावणारा द्राक्षरस पाजला आहे.
स्तोत्रसंहिता 60 : 4 (IRVMR)
तुझा आदर करणाऱ्यास तू निशाण दिले आहे, यासाठी की, त्यांनी सत्याकरता तो उभारावा.
स्तोत्रसंहिता 60 : 5 (IRVMR)
ज्यांच्यावर तू प्रेम करतो त्यांची सुटका व्हावी, म्हणून तुझ्या उजव्या हाताने आमची सुटका कर आणि आम्हास उत्तर दे.
स्तोत्रसंहिता 60 : 6 (IRVMR)
देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी जल्लोष करीन; मी शखेमाची वाटणी करीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
स्तोत्रसंहिता 60 : 7 (IRVMR)
गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे; एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझा राजदंड आहे.
स्तोत्रसंहिता 60 : 8 (IRVMR)
मवाब माझे धुण्याचे पात्र आहे; अदोमावर मी माझे पादत्राण फेकीन; मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन.
स्तोत्रसंहिता 60 : 9 (IRVMR)
मला बळकट नगरात कोण नेईल? मला अदोमात कोण नेईल?
स्तोत्रसंहिता 60 : 10 (IRVMR)
हे देवा, तू आम्हास नाकारले नाही? परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस.
स्तोत्रसंहिता 60 : 11 (IRVMR)
तू आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत कर, कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे.
स्तोत्रसंहिता 60 : 12 (IRVMR)
आम्ही देवाच्या मदतीने विजयी होऊ; तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडविल.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12