स्तोत्रसंहिता 61 : 1 (IRVMR)
देवाच्या संरक्षणावर भरवसा दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझी आरोळी ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
स्तोत्रसंहिता 61 : 2 (IRVMR)
जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन; माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने.
स्तोत्रसंहिता 61 : 3 (IRVMR)
कारण तू माझ्यासाठी आश्रय, माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस.
स्तोत्रसंहिता 61 : 4 (IRVMR)
मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन.
स्तोत्रसंहिता 61 : 5 (IRVMR)
कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे.
स्तोत्रसंहिता 61 : 6 (IRVMR)
तू राजाचे आयुष्य वाढव; त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत.
स्तोत्रसंहिता 61 : 7 (IRVMR)
मी देवासमोर सर्वकाळ राहो; तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील.
स्तोत्रसंहिता 61 : 8 (IRVMR)
मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन, म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.

1 2 3 4 5 6 7 8