स्तोत्रसंहिता 62 : 1 (IRVMR)
आपली भिस्त केवळ देवावर दाविदाचे स्तोत्र माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे; त्याच्यापासून माझे तारण येते.
स्तोत्रसंहिता 62 : 2 (IRVMR)
तोच केवळ माझा खडक आणि माझे तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी कधीही ढळणार नाही.
स्तोत्रसंहिता 62 : 3 (IRVMR)
झुकलेल्या भिंतीसारख्या, कोसळलेल्या कुंपणासारखा झालेल्या, एका मनुष्यास मारण्यासाठी तुम्ही सर्वजण किती काळपर्यंत त्याच्यावर हल्ला करून याल?
स्तोत्रसंहिता 62 : 4 (IRVMR)
त्याच्या उच्च पदापासून त्यास खाली आणण्यासाठी मात्र ते सल्ला घेतात; त्यांना लबाड बोलण्यास आवडते; ते आपल्या मुखाने आशीर्वाद देतात, पण त्यांच्या अंतःकरणातून शाप देतात.
स्तोत्रसंहिता 62 : 5 (IRVMR)
हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर; कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे.
स्तोत्रसंहिता 62 : 6 (IRVMR)
तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही.
स्तोत्रसंहिता 62 : 7 (IRVMR)
माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे; माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे.
स्तोत्रसंहिता 62 : 8 (IRVMR)
अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा; त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा; देव आमच्यासाठी आश्रय आहे.
स्तोत्रसंहिता 62 : 9 (IRVMR)
खरोखर नीच माणसे निरर्थक आहेत, आणि उच्च माणसे लबाड आहेत; वजन केले असता हलके भरतील; त्यांना मापले असता ते केवळ मिथ्या आहेत.
स्तोत्रसंहिता 62 : 10 (IRVMR)
दडपशाहीवर आणि चोरीवर भरवसा ठेवू नका; आणि संपत्तित निरुपयोगी आशा ठेवू नका;
स्तोत्रसंहिता 62 : 11 (IRVMR)
देव एकदा बोलला आहे, मी दोनदा ऐकले आहे, सामर्थ्य देवाचे आहे.
स्तोत्रसंहिता 62 : 12 (IRVMR)
हे प्रभू, तुझ्या ठायी प्रेमदया आहे. कारण प्रत्येक मनुष्यास त्याने जसे केले आहे त्याप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12