स्तोत्रसंहिता 63 : 1 (IRVMR)
देव तान्हेल्या जिवांचे समाधान करतो दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन; शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे; माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे.
स्तोत्रसंहिता 63 : 2 (IRVMR)
म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे.
स्तोत्रसंहिता 63 : 3 (IRVMR)
कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे; माझे ओठ तुझी स्तुती करतील.
स्तोत्रसंहिता 63 : 4 (IRVMR)
म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन; मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन.
स्तोत्रसंहिता 63 : 5 (IRVMR)
माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल; माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील.
स्तोत्रसंहिता 63 : 6 (IRVMR)
मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो.
स्तोत्रसंहिता 63 : 7 (IRVMR)
कारण तू माझे सहाय्य आहे, आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे.
स्तोत्रसंहिता 63 : 8 (IRVMR)
माझा जीव तुला चिकटून राहतो; तुझा उजवा हात मला आधार देतो.
स्तोत्रसंहिता 63 : 9 (IRVMR)
पण जे माझ्या जिवाचा नाश करण्याचा शोध घेतात ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील.
स्तोत्रसंहिता 63 : 10 (IRVMR)
त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल; त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील.
स्तोत्रसंहिता 63 : 11 (IRVMR)
परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल; जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल, पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11