स्तोत्रसंहिता 65 : 1 (IRVMR)
{निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकारस्तुती} [PS] हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो; [QBR] तुला केलेला आमचा नवस तेथे फेडण्यात येईल. [QBR]
स्तोत्रसंहिता 65 : 2 (IRVMR)
जो तू प्रार्थना ऐकतोस, [QBR] त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. [QBR]
स्तोत्रसंहिता 65 : 3 (IRVMR)
दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे. [QBR] आमचे अपराध तर तूच क्षमा करशील. [QBR]
स्तोत्रसंहिता 65 : 4 (IRVMR)
ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे, [QBR] याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे. [QBR] तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्या [QBR] उत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ. [QBR]
स्तोत्रसंहिता 65 : 5 (IRVMR)
हे आमच्या तारणाऱ्या देवा, [QBR] जो तू पृथ्वीच्या सर्व सीमांचा [QBR] आणि दूर समुद्रावर जे आहेत त्यांचा भरवसा आहेस, [QBR] तो तू न्यायीपणाने अतिआश्चर्यकारक गोष्टींनी आम्हास उत्तरे देतोस. [QBR]
स्तोत्रसंहिता 65 : 6 (IRVMR)
कारण तू आपल्या सामर्थ्याने कंबर बांधून, [QBR] पर्वत दृढ केले आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 65 : 7 (IRVMR)
तू गर्जणाऱ्या समुद्राला, [QBR] त्यांच्या लाटांच्या गर्जनेला [QBR] आणि लोकांचा गलबला शांत करतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 65 : 8 (IRVMR)
जे पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागामध्ये राहतात ते तुझ्या कृत्याच्या चिन्हांमुळे भितात; [QBR] तू पूर्व आणि पश्चिम यांना आनंदित करतोस. [QBR]
स्तोत्रसंहिता 65 : 9 (IRVMR)
तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस; [QBR] तू तिला फारच समृद्ध करतोस; [QBR] देवाची नदी जलपूर्ण आहे; [QBR] तू भूमी तयार करून मनुष्यजातीला धान्य पुरवतोस. [QBR]
स्तोत्रसंहिता 65 : 10 (IRVMR)
तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस; [QBR] तू तिचे उंचवटे सपाट करतोस; [QBR] तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. [QBR] तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस [QBR]
स्तोत्रसंहिता 65 : 11 (IRVMR)
तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस; [QBR] तुझ्या रथामागील वाटेतून पृथ्वीवर खाली समृद्धी गाळतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 65 : 12 (IRVMR)
रानातील कुरणावर त्या समृद्धी गाळतात [QBR] आणि डोंगर उल्लासाने वेढलेले आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 65 : 13 (IRVMR)
कुरणांनी कळप पांघरले आहेत; [QBR] दऱ्यासुद्धा धान्यांनी झाकल्या आहेत. [QBR] ते आनंदाने आरोळी मारीत आहेत आणि ते गात आहेत. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: