स्तोत्रसंहिता 66 : 1 (IRVMR)
देवाच्या महत्कृत्यांबद्दल उपकारस्तुती अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा;
स्तोत्रसंहिता 66 : 2 (IRVMR)
त्याच्या नावाचा महिमा गा; त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा.
स्तोत्रसंहिता 66 : 3 (IRVMR)
देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत, तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात.
स्तोत्रसंहिता 66 : 4 (IRVMR)
सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील; आणि तुझी स्तोत्रे गातील; ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.
स्तोत्रसंहिता 66 : 5 (IRVMR)
अहो या, आणि देवाची कार्ये पहा; तो मनुष्यांच्या मुलांस आपल्या कृत्यांनी धाक बसवतो.
स्तोत्रसंहिता 66 : 6 (IRVMR)
त्याने समुद्र पालटून कोरडी भूमी केली; ते नदीतून पायांनी चालत गेले; तेथे आम्ही त्याच्यात आनंद केला.
स्तोत्रसंहिता 66 : 7 (IRVMR)
तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करतो; तो आपल्या डोळ्यांनी सर्व राष्ट्रांचे निरीक्षण करतो; बंडखोरांनी आपल्यास उंच करू नये.
स्तोत्रसंहिता 66 : 8 (IRVMR)
अहो लोकांनो, आमच्या देवाला धन्यवाद द्या, आणि त्याची स्तुती ऐकू येईल अशी करा.
स्तोत्रसंहिता 66 : 9 (IRVMR)
तो आमचा जीव राखून ठेवतो, आणि तो आमचे पाय सरकू देत नाही.
स्तोत्रसंहिता 66 : 10 (IRVMR)
कारण हे देवा, तू आमची परीक्षा केली आहे; रुप्याची परीक्षा करतात तशी तू आमची परीक्षा केली आहे.
स्तोत्रसंहिता 66 : 11 (IRVMR)
तू आम्हास जाळ्यात आणले; तू आमच्या कमरेवर अवजड ओझे ठेवले.
स्तोत्रसंहिता 66 : 12 (IRVMR)
तू आमच्या डोक्यावरून लोकांस स्वारी करण्यास लावले. आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून गेलो, परंतु तू आम्हास बाहेर काढून प्रशस्त जागी आणले.
स्तोत्रसंहिता 66 : 13 (IRVMR)
मी होमार्पणे घेऊन तुझ्या घरात येईन; मी तुला केलेले नवस फेडीन.
स्तोत्रसंहिता 66 : 14 (IRVMR)
संकटात असता जे मी आपल्या ओठांनी उच्चारले आणि जे मी आपल्या तोंडाने बोलल,
स्तोत्रसंहिता 66 : 15 (IRVMR)
मी तुला मेंढ्याच्या धूपासहित पुष्ट पशूंचे होमार्पणे मी तुला अर्पीण; बोकड आणि गोऱ्हे अर्पीण.
स्तोत्रसंहिता 66 : 16 (IRVMR)
जे सर्व तुम्ही देवाचे भय धरता, या आणि ऐका, आणि त्याने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हास सांगतो.
स्तोत्रसंहिता 66 : 17 (IRVMR)
मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला, आणि माझ्या जीभेवर त्याची स्तुती होती.
स्तोत्रसंहिता 66 : 18 (IRVMR)
जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असते, तर प्रभूने माझे ऐकले नसते.
स्तोत्रसंहिता 66 : 19 (IRVMR)
पण देवाने खचित ऐकले आहे; त्याने माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे लक्ष दिले आहे.
स्तोत्रसंहिता 66 : 20 (IRVMR)
देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझ्या प्रार्थनांपासून आपले मुख फिरविले नाही, किंवा त्याच्या कराराच्या विश्वासूपणापासून आपली दृष्टी वळविली नाही.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20