स्तोत्रसंहिता 67 : 1 (IRVMR)
देवाचे उपकारस्मरण करण्याचा राष्ट्रांना आदेश देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा.
स्तोत्रसंहिता 67 : 2 (IRVMR)
याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे.
स्तोत्रसंहिता 67 : 3 (IRVMR)
हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
स्तोत्रसंहिता 67 : 4 (IRVMR)
राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील.
स्तोत्रसंहिता 67 : 5 (IRVMR)
हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
स्तोत्रसंहिता 67 : 6 (IRVMR)
भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो.
स्तोत्रसंहिता 67 : 7 (IRVMR)
देव आम्हास आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत.

1 2 3 4 5 6 7