स्तोत्रसंहिता 68 : 1 (IRVMR)
{सीयोनेचा व पवित्रस्थानाचा परमेश्वर} [PS] देवाने उठावे; त्याचे वैरी विखरले जावोत; [QBR] जे त्याचा तिरस्कार करतात तेही त्याच्यापुढून पळून जावोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 2 (IRVMR)
जसा धूर पांगला जातो, तसे त्यांना दूर पांगून टाक; [QBR] जसे मेण अग्नीपुढे वितळते, तसे दुर्जन देवापुढे नष्ट होवोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 3 (IRVMR)
परंतु नीतिमान आनंदित होवोत; ते देवापुढे हर्षभरित होवोत; [QBR] ते हर्षोत आणि आनंदी होवोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 4 (IRVMR)
देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा; [QBR] ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून [* ढगातून] चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; [QBR] त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 5 (IRVMR)
तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार [† न्यायाधीश] [QBR] असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 6 (IRVMR)
देव एकाकी असलेल्यास कुटुंबात ठेवतो; [QBR] तो बंदिवानास गीत गात बाहेर आणतो; [QBR] पण बंडखोर तृषित प्रदेशात राहतात. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 7 (IRVMR)
हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे गेला, [QBR] जेव्हा तू रानातून चालत गेलास, [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 8 (IRVMR)
तेव्हा भूमी कापली; [QBR] देवाच्या उपस्थितीत आकाशातून पाऊसही पडला, [QBR] देवाच्या उपस्थितीत, इस्राएलाच्या देवाच्या उपस्थित सीनाय पर्वतदेखील कंपित झाला. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 9 (IRVMR)
हे देवा, तू विपुल पाऊस पाठवलास; [QBR] जेव्हा तुझे वतन शिणलेले होते तेव्हा तू ते बळकट केलेस. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 10 (IRVMR)
तुझे लोक त्यामध्ये राहिले; [QBR] हे देवा, तू आपल्या चांगुलपणातून गरीबांना दिले. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 11 (IRVMR)
परमेश्वराने आज्ञा दिली, [QBR] आणि ज्यांनी त्यांना घोषणा केली ते मोठे सैन्य होते. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 12 (IRVMR)
सैन्यांचे राजे पळून जातात, ते पळून जातात, [QBR] आणि घरी राहणारी स्री लूट वाटून घेते. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 13 (IRVMR)
जेव्हा तुम्ही काही लोक मेंढवाड्यामध्ये पडून राहता, [QBR] तेव्हा ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मढवलेले आहेत, [QBR] अशा कबुतरासारखे तुम्ही आहात. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 14 (IRVMR)
तेथे सर्वसमर्थाने राजांना विखरले आहे, [QBR] तेव्हा सल्मोनावर बर्फ पडते त्याप्रमाणे झाले. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 15 (IRVMR)
हे महान पर्वता, बाशानाच्या पर्वता, [QBR] उंच बाशान पर्वत शिखरांचा पर्वत आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 16 (IRVMR)
देवाला आपल्या निवासासाठी जो पर्वत आवडला आहे, [QBR] त्याच्याकडे हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू हेव्याने का पाहतोस? [QBR] खरोखर, परमेश्वर त्याच्यावरच सर्वकाळ राहील. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 17 (IRVMR)
देवाचे रथ वीस हजार आहेत, हजारो हजार आहेत. [QBR] जसा सीनाय पर्वतावर पवित्रस्थान, तसा प्रभू त्यांच्यामध्ये आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 18 (IRVMR)
तू उंचावर चढलास; तू बंदिवानास दूर नेले आहे; [QBR] मनुष्याकडून आणि जे तुझ्याविरूद्ध लढले [QBR] त्यांच्यापासूनही भेटी स्वीकारल्या आहेत, [QBR] यासाठी की, हे परमेश्वर देवा, तू तेथे रहावे. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 19 (IRVMR)
प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो, [QBR] देव आमचे तारण आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 20 (IRVMR)
आमचा देव आम्हास तारणारा देव आहे; [QBR] मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 21 (IRVMR)
पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल, [QBR] जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 22 (IRVMR)
परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकांस बाशानापासून परत आणीन, [QBR] समुद्राच्या खोल स्थानातून त्यांना परत आणीन. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 23 (IRVMR)
यासाठी की, तू आपल्या शत्रूला चिरडावे, आपला पाय त्यांच्या रक्तात बुडवा, [QBR] आणि तुझ्या शत्रुंकडून तुझ्या कुत्र्यांच्या जिभेस वाटा मिळावा. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 24 (IRVMR)
हे देवा, त्यांनी तुझ्या मिरवणुका पाहिल्या आहेत, [QBR] पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका त्यांनी पाहिल्या आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 25 (IRVMR)
गायकपुढे गेले, वाजवणारे मागे चालले आहेत, [QBR] आणि मध्ये कुमारी कन्या लहान डफ वाजवत चालल्या आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 26 (IRVMR)
मंडळीत देवाचा धन्यवाद करा; [QBR] जे तुम्ही इस्राएलाचे खरे वंशज आहात ते तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 27 (IRVMR)
तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामीन, कनिष्ठ कुळ, [QBR] यहूदाचे अधिपती, व त्याच्याबरोबरचे समुदाय [QBR] जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 28 (IRVMR)
तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे; [QBR] हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 29 (IRVMR)
यरूशलेमातील मंदिराकरता, [QBR] राजे तुला भेटी आणतील. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 30 (IRVMR)
लव्हाळ्यात राहणारे वनपशू, [QBR] बैलांचा कळप आणि त्यांचे वासरे ह्यांना धमकाव. [QBR] जे खंडणीची मागणी करतात त्यांना आपल्या पायाखाली तुडव; [QBR] जे लढाईची आवड धरतात त्यांना विखरून टाक. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 31 (IRVMR)
मिसरमधून सरदार येतील; [QBR] कूश आपले हात देवाकडे पसरण्याची घाई करील. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 32 (IRVMR)
अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाला गीत गा, [QBR] परमेश्वराची स्तुतिगीते गा. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 33 (IRVMR)
जो पुरातन काळापासून अस्तित्वात आहे तो आकाशांच्या आकांशावर आरूढ होतो; [QBR] पाहा, तो आपला आवाज सामर्थ्याने उंचावतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 34 (IRVMR)
देवाच्या सामर्थ्याचे वर्णन करा; [QBR] इस्राएलावर त्याचे वैभव [QBR] आणि आकाशात त्याचे बल आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 68 : 35 (IRVMR)
हे देवा, तू आपल्या पवित्रस्थानात भयप्रद आहे; [QBR] इस्राएलाचा देव आपल्या लोकांस बल आणि सामर्थ्य देतो. [QBR] देव धन्यवादित असो. [PE]
❮
❯