स्तोत्रसंहिता 68 : 1 (IRVMR)
सीयोनेचा व पवित्रस्थानाचा परमेश्वर दाविदाचे स्तोत्र देवाने उठावे; त्याचे वैरी विखरले जावोत; जे त्याचा तिरस्कार करतात तेही त्याच्यापुढून पळून जावोत.
स्तोत्रसंहिता 68 : 2 (IRVMR)
जसा धूर पांगला जातो, तसे त्यांना दूर पांगून टाक; जसे मेण अग्नीपुढे वितळते, तसे दुर्जन देवापुढे नष्ट होवोत.
स्तोत्रसंहिता 68 : 3 (IRVMR)
परंतु नीतिमान आनंदित होवोत; ते देवापुढे हर्षभरित होवोत; ते हर्षोत आणि आनंदी होवोत.
स्तोत्रसंहिता 68 : 4 (IRVMR)
देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा; ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून* ढगातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा.
स्तोत्रसंहिता 68 : 5 (IRVMR)
तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार † न्यायाधीश असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो.
स्तोत्रसंहिता 68 : 6 (IRVMR)
देव एकाकी असलेल्यास कुटुंबात ठेवतो; तो बंदिवानास गीत गात बाहेर आणतो; पण बंडखोर तृषित प्रदेशात राहतात.
स्तोत्रसंहिता 68 : 7 (IRVMR)
हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे गेला, जेव्हा तू रानातून चालत गेलास,
स्तोत्रसंहिता 68 : 8 (IRVMR)
तेव्हा भूमी कापली; देवाच्या उपस्थितीत आकाशातून पाऊसही पडला, देवाच्या उपस्थितीत, इस्राएलाच्या देवाच्या उपस्थित सीनाय पर्वतदेखील कंपित झाला.
स्तोत्रसंहिता 68 : 9 (IRVMR)
हे देवा, तू विपुल पाऊस पाठवलास; जेव्हा तुझे वतन शिणलेले होते तेव्हा तू ते बळकट केलेस.
स्तोत्रसंहिता 68 : 10 (IRVMR)
तुझे लोक त्यामध्ये राहिले; हे देवा, तू आपल्या चांगुलपणातून गरीबांना दिले.
स्तोत्रसंहिता 68 : 11 (IRVMR)
परमेश्वराने आज्ञा दिली, आणि ज्यांनी त्यांना घोषणा केली ते मोठे सैन्य होते.
स्तोत्रसंहिता 68 : 12 (IRVMR)
सैन्यांचे राजे पळून जातात, ते पळून जातात, आणि घरी राहणारी स्री लूट वाटून घेते.
स्तोत्रसंहिता 68 : 13 (IRVMR)
जेव्हा तुम्ही काही लोक मेंढवाड्यामध्ये पडून राहता, तेव्हा ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मढवलेले आहेत, अशा कबुतरासारखे तुम्ही आहात.
स्तोत्रसंहिता 68 : 14 (IRVMR)
तेथे सर्वसमर्थाने राजांना विखरले आहे, तेव्हा सल्मोनावर बर्फ पडते त्याप्रमाणे झाले.
स्तोत्रसंहिता 68 : 15 (IRVMR)
हे महान पर्वता, बाशानाच्या पर्वता, उंच बाशान पर्वत शिखरांचा पर्वत आहे.
स्तोत्रसंहिता 68 : 16 (IRVMR)
देवाला आपल्या निवासासाठी जो पर्वत आवडला आहे, त्याच्याकडे हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू हेव्याने का पाहतोस? खरोखर, परमेश्वर त्याच्यावरच सर्वकाळ राहील.
स्तोत्रसंहिता 68 : 17 (IRVMR)
देवाचे रथ वीस हजार आहेत, हजारो हजार आहेत. जसा सीनाय पर्वतावर पवित्रस्थान, तसा प्रभू त्यांच्यामध्ये आहे.
स्तोत्रसंहिता 68 : 18 (IRVMR)
तू उंचावर चढलास; तू बंदिवानास दूर नेले आहे; मनुष्याकडून आणि जे तुझ्याविरूद्ध लढले त्यांच्यापासूनही भेटी स्वीकारल्या आहेत, यासाठी की, हे परमेश्वर देवा, तू तेथे रहावे.
स्तोत्रसंहिता 68 : 19 (IRVMR)
प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो, देव आमचे तारण आहे.
स्तोत्रसंहिता 68 : 20 (IRVMR)
आमचा देव आम्हास तारणारा देव आहे; मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे.
स्तोत्रसंहिता 68 : 21 (IRVMR)
पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल, जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल.
स्तोत्रसंहिता 68 : 22 (IRVMR)
परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकांस बाशानापासून परत आणीन, समुद्राच्या खोल स्थानातून त्यांना परत आणीन.
स्तोत्रसंहिता 68 : 23 (IRVMR)
यासाठी की, तू आपल्या शत्रूला चिरडावे, आपला पाय त्यांच्या रक्तात बुडवा, आणि तुझ्या शत्रुंकडून तुझ्या कुत्र्यांच्या जिभेस वाटा मिळावा.
स्तोत्रसंहिता 68 : 24 (IRVMR)
हे देवा, त्यांनी तुझ्या मिरवणुका पाहिल्या आहेत, पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका त्यांनी पाहिल्या आहेत.
स्तोत्रसंहिता 68 : 25 (IRVMR)
गायकपुढे गेले, वाजवणारे मागे चालले आहेत, आणि मध्ये कुमारी कन्या लहान डफ वाजवत चालल्या आहेत.
स्तोत्रसंहिता 68 : 26 (IRVMR)
मंडळीत देवाचा धन्यवाद करा; जे तुम्ही इस्राएलाचे खरे वंशज आहात ते तुम्ही परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 68 : 27 (IRVMR)
तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामीन, कनिष्ठ कुळ, यहूदाचे अधिपती, व त्याच्याबरोबरचे समुदाय जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत.
स्तोत्रसंहिता 68 : 28 (IRVMR)
तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे; हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव.
स्तोत्रसंहिता 68 : 29 (IRVMR)
यरूशलेमातील मंदिराकरता, राजे तुला भेटी आणतील.
स्तोत्रसंहिता 68 : 30 (IRVMR)
लव्हाळ्यात राहणारे वनपशू, बैलांचा कळप आणि त्यांचे वासरे ह्यांना धमकाव. जे खंडणीची मागणी करतात त्यांना आपल्या पायाखाली तुडव; जे लढाईची आवड धरतात त्यांना विखरून टाक.
स्तोत्रसंहिता 68 : 31 (IRVMR)
मिसरमधून सरदार येतील; कूश आपले हात देवाकडे पसरण्याची घाई करील.
स्तोत्रसंहिता 68 : 32 (IRVMR)
अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाला गीत गा, परमेश्वराची स्तुतिगीते गा.
स्तोत्रसंहिता 68 : 33 (IRVMR)
जो पुरातन काळापासून अस्तित्वात आहे तो आकाशांच्या आकांशावर आरूढ होतो; पाहा, तो आपला आवाज सामर्थ्याने उंचावतो.
स्तोत्रसंहिता 68 : 34 (IRVMR)
देवाच्या सामर्थ्याचे वर्णन करा; इस्राएलावर त्याचे वैभव आणि आकाशात त्याचे बल आहे.
स्तोत्रसंहिता 68 : 35 (IRVMR)
हे देवा, तू आपल्या पवित्रस्थानात भयप्रद आहे; इस्राएलाचा देव आपल्या लोकांस बल आणि सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो.
❮
❯