स्तोत्रसंहिता 7 : 1 (IRVMR)
आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रार्थना कूश बन्यामिन याच्या बोलण्यावरुन परमेश्वरास गाईलेले दाविदाचे शिग्गायोन. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझ्याठायी आश्रय घेतो! माझा पाठलाग करणाऱ्यांपासून मला वाचव आणि मला सोडव.
स्तोत्रसंहिता 7 : 2 (IRVMR)
नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील. वाचवायला कोणी समर्थ नसणार, म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील.
स्तोत्रसंहिता 7 : 3 (IRVMR)
परमेश्वरा माझ्या देवा, मी असे काही केले नाही जे शत्रू सांगतात, माझ्या हाती काही अन्याय नाही.
स्तोत्रसंहिता 7 : 4 (IRVMR)
माझ्याशी शांतीने राहणाऱ्याचे मी कधीही वाईट केले नाही. किंवा माझ्याविरोधात जे होते त्यांना इजा केली नाही.
स्तोत्रसंहिता 7 : 5 (IRVMR)
जर मी खरे सांगत नसेल तर, माझे शत्रू माझ्या जीवाच्या पाठीस लागो आणि त्यास गाठून घेवो. तो माझा जीव मातीत तुडवो आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवो.
स्तोत्रसंहिता 7 : 6 (IRVMR)
हे परमेश्वरा, आपल्या क्रोधाने उठ; माझ्या विरोध्यांच्या संतापामुळे उभा राहा, माझ्यासाठी जागा हो आणि तुझ्या न्यायाचा आदेश जो तू आज्ञापीले आहे तो पूर्णत्वास ने.
स्तोत्रसंहिता 7 : 7 (IRVMR)
राष्ट्रांची सभा तुझ्याभोवती येवो, आणि पुन्हा तू त्यांच्यावरती आपले योग्य ठिकाण घे.
स्तोत्रसंहिता 7 : 8 (IRVMR)
परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करतो, परमेश्वरा, मला समर्थन दे, आणि माझ्या न्यायीपणाप्रमाणे आणि माझ्या स्वतःच्या सात्त्विकतेप्रमाणे माझा न्याय कर.
स्तोत्रसंहिता 7 : 9 (IRVMR)
दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत होवो, परंतु धार्मिकाला स्थापित कर. कारण न्यायी देव हृदय व अंतर्यामे पारखणारा आहे.
स्तोत्रसंहिता 7 : 10 (IRVMR)
जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे.
स्तोत्रसंहिता 7 : 11 (IRVMR)
देव न्यायी न्यायाधीश आहे, असा देव जो प्रतिदिवशी न्यायाने रागावतो.
स्तोत्रसंहिता 7 : 12 (IRVMR)
जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर, देव त्याच्या तलवारीला धार लावणार आणि त्याचा धनुष्य युद्धासाठी तयार करणार.
स्तोत्रसंहिता 7 : 13 (IRVMR)
त्याने आपली प्राणघातक शस्त्रे तयार केली आहेत. तो आपले अग्नीबान तयार करतो.
स्तोत्रसंहिता 7 : 14 (IRVMR)
त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत. जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात.
स्तोत्रसंहिता 7 : 15 (IRVMR)
त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला, आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला.
स्तोत्रसंहिता 7 : 16 (IRVMR)
त्याच्या अपायकारक योजना त्याच्याच डोक्यावर परत येतील, आणि त्याची हिंसा त्याच्याच माथ्यावर येईल.
स्तोत्रसंहिता 7 : 17 (IRVMR)
मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन, मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17