स्तोत्रसंहिता 71 : 1 (IRVMR)
वृद्धाची प्रार्थना हे परमेश्वरा, मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; मला कधीही लज्जित होऊ देऊ नको.
स्तोत्रसंहिता 71 : 2 (IRVMR)
मला सोडव आणि तुझ्या न्यायीपणात मला सुरक्षित ठेव; तू आपला कान मजकडे लाव आणि माझे तारण कर.
स्तोत्रसंहिता 71 : 3 (IRVMR)
मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो; तू मला तारावयास आज्ञा दिली आहे, कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस.
स्तोत्रसंहिता 71 : 4 (IRVMR)
हे माझ्या देवा, तू मला दुष्टांच्या हातातून वाचव, अन्यायी आणि निष्ठूर मनुष्याच्या हातातून मला वाचव.
स्तोत्रसंहिता 71 : 5 (IRVMR)
कारण हे प्रभू, तू माझी आशा आहेस. मी लहान मूल होतो तेव्हापासूनच तू माझा भरवसा आहे.
स्तोत्रसंहिता 71 : 6 (IRVMR)
गर्भापासून तूच माझा आधार आहेस; माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले; माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल.
स्तोत्रसंहिता 71 : 7 (IRVMR)
पुष्कळ लोकांस मी कित्ता झालो आहे; तू माझा बळकट आश्रय आहे.
स्तोत्रसंहिता 71 : 8 (IRVMR)
माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने आणि सन्मानाने भरलेले असो.
स्तोत्रसंहिता 71 : 9 (IRVMR)
माझ्या वृद्धापकाळात मला दूर फेकून देऊ नको; जेव्हा माझी शक्ती कमी होईल तेव्हा मला सोडू नकोस.
स्तोत्रसंहिता 71 : 10 (IRVMR)
कारण माझे शत्रू माझ्याविरूद्ध बोलत आहेत; जे माझ्या जिवावर पाळत ठेवून आहेत ते एकत्रित येऊन कट करत आहेत.
स्तोत्रसंहिता 71 : 11 (IRVMR)
ते म्हणाले देवाने त्यास सोडले आहे; त्याचा पाठलाग करा आणि त्यास घ्या, कारण त्यास सोडवणारा कोणीही नाही.
स्तोत्रसंहिता 71 : 12 (IRVMR)
हे देवा, तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस; माझ्या देवा, माझ्या मदतीला त्वरा कर!
स्तोत्रसंहिता 71 : 13 (IRVMR)
जे माझ्या जिवाचे विरोधी आहेत त्यांना लज्जित आणि नष्ट कर, जे माझे अनिष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना धिक्काराने आणि मानहानीने झाकून टाक.
स्तोत्रसंहिता 71 : 14 (IRVMR)
पण मी तुझ्यात नेहमीच आशा धरून राहीन, आणि तुझी जास्तीत जास्त स्तुती करीत जाईन.
स्तोत्रसंहिता 71 : 15 (IRVMR)
माझे मुख तुझ्या न्यायीपणाचे आणि तारणाविषयी सांगत राहील, जरी मला ते समजले नाही.
स्तोत्रसंहिता 71 : 16 (IRVMR)
प्रभू परमेश्वराच्या सामर्थ्यी कृत्याबरोबर मी त्यांच्याकडे जाईन; मी तुझ्या, केवळ तुझ्याच, नितिमत्वाचा उल्लेख करीन.
स्तोत्रसंहिता 71 : 17 (IRVMR)
हे देवा, तू माझ्या तरुणपणापासून मला शिकवीत आला आहेस; आतासुद्धा तुझी आश्चर्यजनक कृत्ये सांगत आहे.
स्तोत्रसंहिता 71 : 18 (IRVMR)
खरोखर, जेव्हा आता मी म्हातारा आणि केस पिकलेला झालो आहे, तेव्हा पुढल्या पिढीला तुझे सामर्थ्य, येणाऱ्या प्रत्येकाला तुझा पराक्रम मी सांगेपर्यंत, हे देवा, मला सोडू नको.
स्तोत्रसंहिता 71 : 19 (IRVMR)
हे देवा, तुझे नितिमत्व खूप उंच आहे; हे देवा, ज्या तू महान गोष्टी केल्या आहेस, त्या तुझ्यासारखा कोण आहे?
स्तोत्रसंहिता 71 : 20 (IRVMR)
ज्या तू मला अनेक भयंकर संकटे दाखवली, तो तू मला पुन्हा जिवंत करशील; आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील.
स्तोत्रसंहिता 71 : 21 (IRVMR)
तू माझा सन्मान वाढव; आणि पुन्हा वळून माझे सांत्वन कर.
स्तोत्रसंहिता 71 : 22 (IRVMR)
मी सतारीवरही तुला धन्यवाद देईन, हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्रोत्रे गाईन.
स्तोत्रसंहिता 71 : 23 (IRVMR)
मी तुझी स्तवने गाताना माझे ओठ हर्षाने आणि जो माझा जीव तू खंडून घेतला तोही जल्लोष करील.
स्तोत्रसंहिता 71 : 24 (IRVMR)
माझी जीभदेखील दिवसभर तुझ्या नितिमत्वाविषयी बोलेल; कारण ज्यांनी मला इजा करण्याचा प्रयत्न केला ते लज्जित झाले आहेत, आणि गोंधळून गेले आहेत.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24