स्तोत्रसंहिता 72 : 1 (IRVMR)
{नीतिमान राजाची कारकीर्द} [PS] हे देवा, तू राजाला आपले न्यायाचे निर्णय, [QBR] राजाच्या मुलाला आपले न्यायीपण दे. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 2 (IRVMR)
तुझ्या लोकांचा नीतीने न्याय करो, [QBR] आणि तुझ्या गरीब लोकांचा न्यायनिवाडा न्यायाने करो. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 3 (IRVMR)
पर्वत लोकांसाठी शांती उत्पन्न करतील; [QBR] टेकड्या न्यायीपणा उत्पन्न करतील. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 4 (IRVMR)
तो लोकांतील गरीबांचा न्याय करील; [QBR] गरजवंताच्या मुलांना तारील, [QBR] आणि जुलूम करणाऱ्यांचे तुकडे करील. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 5 (IRVMR)
जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, [QBR] तोपर्यंत सर्व पिढ्यानपिढ्या ते तुझा आदर करतील. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 6 (IRVMR)
जसा कापलेल्या गवतावर पाऊस पडतो, [QBR] तशी पृथ्वीला भिजवणारी पावसाची सर उतरून येईल. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 7 (IRVMR)
त्याच्या दिवसात नितिमानाची भरभराट होवो, [QBR] आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती होईल. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 8 (IRVMR)
समुद्रापासून समुद्रापर्यंत [QBR] आणि त्या नदीपासून ते पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 9 (IRVMR)
अरण्यात राहणारे [* शत्रू] त्याच्यासमोर नमन करोत; [QBR] त्याचे शत्रू धूळ चाटोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 10 (IRVMR)
तार्शीश आणि बेटांचे राजे खंडणी देवोत; [QBR] शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणोत. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 11 (IRVMR)
खरोखर, सर्व राजे त्याच्यापुढे नमन करोत; [QBR] सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत; [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 12 (IRVMR)
कारण त्याने धावा करणाऱ्या गरजवंताला, [QBR] आणि गरीबाला दुसरा कोणी मदतनीस नाही त्यास मदत केली आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 13 (IRVMR)
तो गरीब आणि गरजवंतांवर दया करील, [QBR] आणि गरजवंताचा जीव तो तारील. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 14 (IRVMR)
तो त्यांचा जुलूम आणि हिंसाचारापासून त्यांचा जीव खंडून घेईल, [QBR] आणि त्यांचे रक्त त्याच्या दृष्टीने मौलवान आहे. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 15 (IRVMR)
राजा जगेल, त्यास शबाचे सोने दिले जावो. [QBR] लोक त्याच्यासाठी नेहमी प्रार्थना करो; [QBR] देव त्यास दिवसभर आशीर्वाद देवो. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 16 (IRVMR)
तेथे पृथ्वीत पर्वत कळसावर विपुल धान्य येवो; [QBR] तिचे पीक लबानोन झाडासारखे वाऱ्याच्या झुळकेने डुलोत [QBR] आणि नगरातले लोक पृथ्वीच्या गवतासारखी भरभराटीस येवो. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 17 (IRVMR)
राजाचे नाव सर्वकाळ टिकून राहो; [QBR] सूर्य आहे तोपर्यंत त्याचे नाव पुढे चालू राहो; [QBR] त्याच्यात लोक आशीर्वादित होतील; [QBR] सर्व राष्ट्रे त्यास धन्य म्हणतील. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 18 (IRVMR)
परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, धन्यवादित असो, [QBR] तोच फक्त आश्चर्यकारक गोष्टी करतो. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 19 (IRVMR)
त्याचे गौरवशाली नाव सर्वकाळ धन्यवादित असो [QBR] आणि सर्व पृथ्वी त्याच्या गौरवाने भरली जावो. आमेन आणि आमेन. [QBR]
स्तोत्रसंहिता 72 : 20 (IRVMR)
इशायाचा मुलगा दावीद याच्या प्रार्थना इथे संपल्या. [PE]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: