स्तोत्रसंहिता 73 : 1 (IRVMR)
शत्रूचा शेवट आसाफाचे स्तोत्र खात्रीने देव इस्राएलास चांगला आहे, जे अंतःकरणाने शुद्ध आहेत.
स्तोत्रसंहिता 73 : 2 (IRVMR)
पण माझ्यासाठी जसे माझे पाय बहुतेक निसटणार होते; माझे पाय बहुतेक माझ्या खालून निसटणार होते.
स्तोत्रसंहिता 73 : 3 (IRVMR)
कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला.
स्तोत्रसंहिता 73 : 4 (IRVMR)
कारण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना वेदना होत नाही, पण ते बलवान आणि चांगले पुष्ट असतात.
स्तोत्रसंहिता 73 : 5 (IRVMR)
दुसऱ्या मनुष्याच्या भारापासून मुक्त असतात; ते दुसऱ्या मनुष्यासारखे जुलूमात नसतात.
स्तोत्रसंहिता 73 : 6 (IRVMR)
अभिमानाने ते त्यांच्या गळ्याभोवती असलेल्या हाराप्रमाणे आपल्याला सुशोभित करतात; झग्यासारखा ते हिंसाचाराचे वस्र घालतात.
स्तोत्रसंहिता 73 : 7 (IRVMR)
अंधत्वातून असे पाप बाहेर येते; वाईट विचार त्यांच्या अंतःकरणातून निघतात.
स्तोत्रसंहिता 73 : 8 (IRVMR)
ते माझी चेष्टा करून वाईट गोष्टी बोलतात; ते गर्वाने हिंसाचाराची धमकी देतात.
स्तोत्रसंहिता 73 : 9 (IRVMR)
ते आकाशाविरूद्ध बोलतात, आणि त्यांची जीभ पृथ्वीतून भटकते.
स्तोत्रसंहिता 73 : 10 (IRVMR)
म्हणून देवाचे लोक त्यांच्याकडे वळतात आणि त्यांच्या वचनातले पाणी भरपूर पितात.
स्तोत्रसंहिता 73 : 11 (IRVMR)
ते म्हणतात, “देवाला हे कसे माहित होणार? काय चालले आहे ते देवाला कसे कळते?”
स्तोत्रसंहिता 73 : 12 (IRVMR)
पाहा हे लक्षात घ्या, हे लोक दुष्ट आहेत; ते नेहमी चिंतामुक्त असून धनवान झाले आहेत.
स्तोत्रसंहिता 73 : 13 (IRVMR)
खचित मी आपले हृदय जपले, आणि आपले हात निरागसतेत धुतले हे व्यर्थ आहे.
स्तोत्रसंहिता 73 : 14 (IRVMR)
कारण दिवसभर मी पीडला जातो आणि प्रत्येक सकाळी शिक्षा होते.
स्तोत्रसंहिता 73 : 15 (IRVMR)
जर मी म्हणालो असतो की, मी या गोष्टी बोलेन, तर मी या पिढीच्या तुझ्या मुलांचा विश्वासघात केला असता.
स्तोत्रसंहिता 73 : 16 (IRVMR)
तरी या गोष्टी मी समजण्याचा प्रयत्न केला, पण त्या माझ्यासाठी खूप कठीण होत्या.
स्तोत्रसंहिता 73 : 17 (IRVMR)
मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो, आणि नंतर त्यांच्या भवितव्याचा शेवट मला समजून आला.
स्तोत्रसंहिता 73 : 18 (IRVMR)
खचित तू त्यांना निसरड्या जागी ठेवतो; त्यांना तू खाली नाशात पाडतोस.
स्तोत्रसंहिता 73 : 19 (IRVMR)
कसे अचानक ते उध्वस्त झाले. आणि भयानक दहशतीत ते संपूर्ण नष्ट झाले.
स्तोत्रसंहिता 73 : 20 (IRVMR)
जागा झालेल्या मनुष्यास जसे स्वप्न निरर्थक वाटते; तसे हे प्रभू, जेव्हा तू जागा होशील, तेव्हा त्यांचे ते स्वप्न तुच्छ मानशील.
स्तोत्रसंहिता 73 : 21 (IRVMR)
कारण माझे हृदय दुःखीत झाले होते, आणि मी खोलवर घायाळ झालो.
स्तोत्रसंहिता 73 : 22 (IRVMR)
मी अज्ञानी होतो आणि सूक्ष्मदृष्टीची उणीव होती; मी तुझ्यापुढे मूर्ख प्राण्यासारखा होतो.
स्तोत्रसंहिता 73 : 23 (IRVMR)
तरी मी तुझ्याबरोबर नेहमी आहे; तू माझा उजवा हात धरला आहे.
स्तोत्रसंहिता 73 : 24 (IRVMR)
तू आपल्या उपदेशाने मला मार्ग दाखवशील आणि त्यानंतर तू मला गौरवात स्वीकारशील.
स्तोत्रसंहिता 73 : 25 (IRVMR)
स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय कोणी प्रिय नाही?
स्तोत्रसंहिता 73 : 26 (IRVMR)
माझा देह आणि माझे हृदय दुर्बल होत आहेत, पण देव सर्वकाळ माझ्या हृदयाचे सामर्थ्य * सामर्थ्य आहे.
स्तोत्रसंहिता 73 : 27 (IRVMR)
जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; जे तुझ्याशी अविश्वासू आहेत त्या सर्वांचा तू नाश करशील.
स्तोत्रसंहिता 73 : 28 (IRVMR)
पण माझ्याविषयी म्हटले, तर देवाजवळ जाणे यामध्येच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वरास आपले आश्रयस्थान केले आहे. मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करीन.
❮
❯