स्तोत्रसंहिता 74 : 1 (IRVMR)
देवाच्या प्रजेच्या शत्रूंविषयी गाऱ्हाणे आसाफाचे स्तोत्र हे देवा, तू आम्हास सर्वकाळ का सोडून दिले आहेस? आपल्या कुरणातील कळपांवर तुझा कोपाग्नि का भडकत आहे?
स्तोत्रसंहिता 74 : 2 (IRVMR)
तू प्राचीनकाळी जी मंडळी विकत घेतली, जिला तू आपले वारस होण्याकरता खंडणी भरून सोडविले तिचे, व ज्या सीयोन पर्वतावर तू वस्ती केली त्याची आठवण कर.
स्तोत्रसंहिता 74 : 3 (IRVMR)
पूर्णपणे विध्वंस झालेल्याकडे या, शत्रूने सर्व पवित्रस्थानाचे कसे नुकसान केले आहे ते पहा.
स्तोत्रसंहिता 74 : 4 (IRVMR)
तुझ्या सभास्थानात तुझे शत्रू गर्जना करीत आहेत; त्यांनी युद्धाची झेंडे उभारले आहेत.
स्तोत्रसंहिता 74 : 5 (IRVMR)
जसे दाट झाडीवर कुऱ्हाडीने छिन्नविछीन्न करणाऱ्या मनुष्याप्रमाणे ते त्यांना दिसले.
स्तोत्रसंहिता 74 : 6 (IRVMR)
त्यांनी कुऱ्हाडीने आणि हातोडीने सर्व कोरीव काम तोडून आणि फोडून टाकले.
स्तोत्रसंहिता 74 : 7 (IRVMR)
त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली; जेथे तू राहतो त्याचे पावित्र्य भ्रष्ट केले, धुळीस मिळविले.
स्तोत्रसंहिता 74 : 8 (IRVMR)
ते आपल्या अंतःकरणात म्हणाले, आपण ह्यांचा नायनाट करून टाकू. त्यांनी देशात असलेली देवाची सर्व सभास्थाने जाळून टाकली आहेत.
स्तोत्रसंहिता 74 : 9 (IRVMR)
आम्हास देवाकडून कोणतेही चिन्ह मिळाले नाही, कोणी संदेष्टा उरला नाही; असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही.
स्तोत्रसंहिता 74 : 10 (IRVMR)
हे देवा, शत्रू किती वेळ माझा अपमान करील? शत्रू तुझ्या नावाची निंदा सर्वकाळ करणार काय?
स्तोत्रसंहिता 74 : 11 (IRVMR)
तू आपला हात, आपला उजवा हात का मागे आवरून धरतोस? तू आपला उजवा हात आपल्या अंगरख्यातून काढ आणि त्यांना नष्ट कर?
स्तोत्रसंहिता 74 : 12 (IRVMR)
तरी देव, प्राचीन काळापासून माझा राजा आहे, पृथ्वीवर तारणारा तो आहे.
स्तोत्रसंहिता 74 : 13 (IRVMR)
तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागला; तू समुद्रातील प्रचंड प्राण्यांची मस्तके पाण्यात फोडली.
स्तोत्रसंहिता 74 : 14 (IRVMR)
तू लिव्याथानाचे * एक समुद्री प्राणी मस्तक ठेचले; रानात राहणाऱ्यास तो खाऊ घातला.
स्तोत्रसंहिता 74 : 15 (IRVMR)
तू झरे आणि प्रवाह फोडून उघडले; तू वाहणाऱ्या नद्या कोरड्या केल्या.
स्तोत्रसंहिता 74 : 16 (IRVMR)
दिवस तुझा आहे आणि रात्रही तुझीच आहे; तू सूर्य आणि चंद्र त्यांच्या जागी ठेवले.
स्तोत्रसंहिता 74 : 17 (IRVMR)
तू पृथ्वीच्या सर्व सीमा ठरविल्या आहेत; तू उन्हाळा आणि हिवाळा केलास.
स्तोत्रसंहिता 74 : 18 (IRVMR)
हे परमेश्वरा, वैऱ्याने तुझ्याकडे अपमान भिरकावला आहे; आणि मूर्ख लोकांनी तुझ्या नावाची निंदा केली आहे त्याची आठवण कर
स्तोत्रसंहिता 74 : 19 (IRVMR)
तू आपल्या कबुतराचा जीव वन्यपशूच्या स्वाधीन करू नकोस. आपल्या दडपशाहीचे जिवन सर्वकाळ विसरू नकोस.
स्तोत्रसंहिता 74 : 20 (IRVMR)
तू आपल्या कराराची आठवण कर, कारण पृथ्वीवरील काळोखी प्रदेश पूर्ण हिंसाचाराची ठिकाणे आहेत.
स्तोत्रसंहिता 74 : 21 (IRVMR)
दडपलेल्यास लज्जित होऊन मागे फिरू देऊ नको; गरीब आणि दडपलेले तुझ्या नावाची स्तुती करोत.
स्तोत्रसंहिता 74 : 22 (IRVMR)
हे देवा, ऊठ, आपल्या सन्मानाचे समर्थन स्वतःच कर; मूर्ख दिवसभर तुझा अपमान करत आहे याची आठवण कर.
स्तोत्रसंहिता 74 : 23 (IRVMR)
तुझ्या शत्रूंचा आवाज विसरू नको, किंवा तुझा विरोध करणाऱ्यांचा गोंगाट एकसारखा वर चढत आहे.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23